भाजपची 'चाणक्य नीती'? १७ इच्छुकांचे तिकीट पक्के; शिंदे गट-अजित पवार गटातून संधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 04:50 PM2024-11-01T16:50:47+5:302024-11-01T16:50:54+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मूळ भाजपामध्ये असलेले परंतु, शिवसेना शिंदे गटात आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाऊन उमेदवारी मिळवलेल्या इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे सांगितले जात आहे.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 originally in bjp but this 17 leaders got nomination opportunity from shinde group and ajit pawar group | भाजपची 'चाणक्य नीती'? १७ इच्छुकांचे तिकीट पक्के; शिंदे गट-अजित पवार गटातून संधी!

भाजपची 'चाणक्य नीती'? १७ इच्छुकांचे तिकीट पक्के; शिंदे गट-अजित पवार गटातून संधी!

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांकडून त्या त्या पक्षातील बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. ही मनधरणी यशस्वी होणार का, याचे उत्तर अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर मिळणार आहे. निवडणुकीसाठी अनेक जण इच्छूक होते. अनेकांनी उमेदवारीसाठी आपले सर्व वजन पणाला लावले. अनेकांना त्या त्या पक्षांकडून उमेदवारीही जाहीर झाली. परंतु, काही जणांना संधी मिळाली नाही. महायुतीचा विचार केल्यास भाजपामधील १७ इच्छुकांनी मित्र पक्षात जाऊन उमेदवारी पक्की केल्याचे पाहायला मिळाले.

भाजपाच्या १२ इच्छुकांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली. तर चार जणांनी अजित पवारांच्या पक्षात जाऊन उमेदवारी पदरात पाडून घेतली. आरपीआयच्या कोट्यातून एक जागा मिळाली आहे. तो उमेदवार भाजपाच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत असल्याचे सांगितले जात आहे. भाजपाची उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर आपल्याला संधी मिळाली नाही किंवा ती जागा मित्र पक्षाला सुटली, हे पाहून इच्छुकांनी पक्षांतर करत निवडणूक रिंगणात जागा पक्की केली. मूळ भाजपामध्ये असलेले परंतु, शिवसेना शिंदे गटात आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाऊन उमेदवारी मिळवलेल्या इच्छुकांची संख्या १७ वर जात असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे भाजपाने निवडणुकीच्या जागावाटपात १५२+ १७ अशी १६९ जागांची बाजी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे म्हटले जात आहे.

भाजपामधून शिवसेना शिंदे गटात जात उमेदवारी मिळालेले नेते कोण?

निलेश राणे - कुडाळ
संजय जाधव दानवे - कणंद
राजेंद्र गावित - पालघर
विलास तरे - बोईसर
संतोष शेट्टी - भिवंडी
मुरजी पटेल - अंधेरी पूर्व
शायना एनसी - मुंबादेवी
अमोल खताळ - संगमनेर
अजित पिंगळे - धाराशिव
दिग्विजय बागल - करमाळा
विठ्ठल लांघे - नेवासा
बळीराम शिर्सेकर - बदलापूर

भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात गेलेले नेते कोण?

राजकुमार बडोले - अर्जुनी मोरगाव
प्रतापराव चिखलीकर - लोहा
संजयकाका पाटील - तासगाव
निशिकांत पाटील - इस्लामपूर
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 originally in bjp but this 17 leaders got nomination opportunity from shinde group and ajit pawar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.