शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 13:17 IST2024-11-01T13:16:25+5:302024-11-01T13:17:17+5:30
महायुतीचे ३६ बंडखोर एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. तर काही नाराज नेते विरोधी पक्षाला छुपा पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
महायुतीत बंडखोरांची संख्या मोठी आहे. महायुतीचे ३६ बंडखोर एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. तर काही नाराज नेते विरोधी पक्षाला छुपा पाठिंबा देण्याची शक्यता आहे. अशातच भाजपाच्या माजी खासदार, अपक्ष उभ्या राहिलेल्या डॉ. हिना गावित यांनी मोठा दावा केला आहे.
नंदूरबार मतदारसंघात एकनाथ शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते काँग्रेसचा प्रचार करत असल्याचा दावा गावित यांनी केला आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते कमी आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जास्त दिसत होते, असे त्या म्हणाल्या.
अक्कलकुवा मतदारसंघ भाजपला सुटावा अशी मागणी मी केली होती. हा सगळ्यात मागासलेला मतदारसंघ आहे. ज्या गावांमध्ये वीज पोहचली नव्हती त्या गावांपर्यंत वीज पोहचवण्याचे काम मी केले आहे. माझ्या खासदारकीच्या कार्यकाळात केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवलेल्या आहेत. परंतू भाजपला हा मतदारसंघ न सुटल्याने मी अपक्ष लढत असल्याचे त्या म्हणाल्या.
लोकसभेला जशी भाजपच्या विरोधात भूमिका घेतली होती, तशीच भूमिका यावेळी घेतली आहे. आम्ही गद्दार नाही. यामुळे काँग्रेसचा प्रचार करणार नाही. त्यामुळेच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, असे गावित म्हणाल्या.