वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 10:26 AM2024-10-26T10:26:16+5:302024-10-26T10:28:04+5:30

Milind Deora vs Aditya Thacekray news: शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. या लोकांनी दत्ता नरवणकर यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: Shiv Sainiks oppose Milind Devara's candidature from Worli Eknath Shinde group; The slogan of "We want a local MLA..." | वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा

वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा

वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंविरोधातएकनाथ शिंदे गट राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे वरळीतील शिवसैनिक नाराज झाले आहेत. आम्हाला स्थानिकच आमदार हवा असे म्हणत काळे फलक घेऊन वरळीतील शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली आहे. 

शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. या लोकांनी दत्ता नरवणकर यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. मागल्या वेळी युवराजाला आम्ही निवडून दिले. तो गेली पाच वर्षे कुठे होता, कोरोना काळात कुठे होता असा सवाल या शिवसैनिकांनी केला आहे. 

स्थानिक आमदार असेल तर काही अडचण आली तर त्याच्याकडे जाऊ शकतो. परंतू बाहेरचा उमेदवार आमदार झाला तर त्याच्याकडे अपॉईंटमेंट घ्यावी लागणार आहे, अशी व्यथा या शिवसैनिकांनी मांडली आहे.  वरळीला स्थानिक उमेदवार असावा अशी मागणी करत शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. जर स्थानिक उमेदवार दिला नाही तर आम्ही मतदान करणार नाही अशी भूमिका या शिवसैनिकांनी घेतली आहे. 

यावेळी शिवसैनिकांच्या हातात काळे फलक होते. यावर स्थानिकच आमदार हवा, आधीचा आमदार पाच वर्षे कुठे होता आदी मागण्या, सवाल करण्यात आले आहेत. 

वरळी मतदारसंघातून मनसेने संदीप देशपांडे यांना रिंगणात उतरविले आहे. देशपांडे हे माहिमचे रहिवासी आहेत. तर आदित्य ठाकरे हे दादरचे रहिवासी आहेत. देशपांडे हे मनसेच्या विविध आंदोलनांमध्ये सहभागी असतात. यामुळे वरळीकरांमध्ये स्थानिकच आमदार हवाय अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता या हेवीवेट मतदारसंघात एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: Shiv Sainiks oppose Milind Devara's candidature from Worli Eknath Shinde group; The slogan of "We want a local MLA..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.