"ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले"; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 05:11 PM2024-11-14T17:11:10+5:302024-11-14T17:22:38+5:30

भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांची एकजूट हवी, असे काही अनुभव आलेत म्हणून हे सांगत आहे. - नारायण राणे

Maharashtra Assembly Vidhan sabha Election I was promised to Balasaheb not to say anything to any Thackeray person; Narayan Rane will reply to Uddhav Thackeray | "ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले"; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार?

"ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले"; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार?

सावंतवाडी, कणकवली येथील सभांमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या मुलांवर टीका केली होती. यापूर्वी सिंधुदूर्गकरांनी गुंडांना बाहेर केले होते, परंतू आता चूकून पुन्हा निवडून दिले आहे. आता मुलांना निवडून दिले तर बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर बसतील असे ठाकरे म्हणाले होते. यावरून नारायण राणे काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना राणेंनी यावर जाहीर सभेत बोलणार असल्याचे म्हटले आहे. 

भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांची एकजूट हवी, असे काही अनुभव आलेत म्हणून हे सांगत आहे. या मतदारसंघातून मला ६ वेळा निवडून दिले. या भागासाठी अनेक कामे केली आहेत. काल उद्धव ठाकरे आले त्यावर जाहीर सभेत बोलेन. पण आजपर्यंत मी राखून होतो, ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला मी काही बोलणार नाही, हे मी बाळासाहेबांना त्यावेळी वचन दिले होते, अशी आठवण राणे यांनी करून दिली. 

तुझा राग शांत झाला का असे बाळासाहेबांनी बोलवून विचारले होते. तुझ्याकडून मला एक शब्द हवा आहे. माझ्यानंतर काही जरी झाले, उद्धव, आदित्य काही जरी बोलले तरी वाईट विचार करू नकोस. मी साहेबांना म्हटले, उद्धव आदित्य काय कोणत्याही ठाकरेंच्या व्यक्तीला मी काही बोलणार नाही, असा शब्द दिली होता. बाळासाहेबांमुळे हा व्यक्ती वाचत आला आहे, असे राणे म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्हा समृद्ध होईल, त्यावेळी आनंद होईल. त्यावेळी सावंतवाडी ते पोलादपूर दरम्यान सर्व आमदार शिवसेनेचे आले म्हणून त्यावेळी कॅबिनेट मला मिळाले होते. आता आरोपांचा योग्य वेळी समाचार घेईन पण येथील तिन्ही जागा ताब्यात घ्या. विरोधकांना ५०-६० हजार मतांनी झोपवायचे आहे. या उद्धव ठाकरे यांनी एक तरी शाळा, हॉस्पिटल बांधले का? असा सवाल राणे यांनी केला. 

या सभेला उदय सामंतही उपस्थित होते. मुंबईत सिंधुरत्न येथे आपल्या पदाधिकाऱ्यांना घर दिले, आज त्यातील अनेक जण नारायण राणे यांना सोडून गेले, तरीही राणेंचा दबदबा कायम असल्याचे सामंत म्हणाले. काल परवा जे येऊन गेले त्यांच्या कॉर्नर सभा होतायत. राणे कुटुंब चिडले पाहिजे म्हणून मुद्दाम उबाठा सेनेचे लोक फिरत आहेत, अशी टीका सामंत यांनी केली. 

Web Title: Maharashtra Assembly Vidhan sabha Election I was promised to Balasaheb not to say anything to any Thackeray person; Narayan Rane will reply to Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.