उद्धव ठाकरेंची सलग दुसऱ्या दिवशी बॅग तपासली; टीकेवर आले निवडणूक आयोगाचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 04:24 PM2024-11-12T16:24:00+5:302024-11-12T16:24:45+5:30

Uddhav Thackeray News: ठाकरेंनी बॅगा तपासणाऱ्या अधिकाऱ्यांना अशाच मोदी, शाह, शिंदेंच्या बॅगा तपासा, असे म्हटले आहे. यावर आता निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. 

Maharashtra Assembly Vidhan sabha Election Uddhav Thackeray's bag checked for second consecutive day; The Election Commission's reply came to the criticism | उद्धव ठाकरेंची सलग दुसऱ्या दिवशी बॅग तपासली; टीकेवर आले निवडणूक आयोगाचे उत्तर

उद्धव ठाकरेंची सलग दुसऱ्या दिवशी बॅग तपासली; टीकेवर आले निवडणूक आयोगाचे उत्तर

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅगा तपासल्यावरून महाराष्ट्रात राजकीय टीका सुरु झालेली असतानाच आज सलग दुसऱ्या दिवशी देखील ठाकरेंच्या बॅगांची झडती घेण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यावरून ठाकरेंनी तपासणाऱ्या अधिकाऱ्यांना अशाच मोदी, शाह, शिंदेंच्या बॅगा तपासा, असे म्हटले आहे. यावर आता निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. 

काल वणी येथे ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची आणि बॅगांची निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती. आज सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्यांनी ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली, आजची घटना लातूरमध्ये घडली आहे. औसामध्ये प्रचारसभेसाठी आलेल्या ठाकरे यांनी आजही संताप व्यक्त केला. आजवर कोणाकोणाच्या बॅगा तपासल्या असा सवाल ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना केला आहे. 

योगायोग म्हणजे उद्धव ठाकरे हेच पहिले या दोन्ही मतदारसंघांत हेलिकॉप्टरने पोहोचले आहेत. यामुळे अधिकाऱ्यांनीही ठाकरेंना जशासतसे उत्तर देत तुम्हीच पहिले आहात असे सांगितले. यावर ठाकरेंनीही मीच पहिला गिऱ्हाईक का, असा सवाल विचारला आहे. याचा व्हिडीओ ठाकरेंनीच शूट करून सोशल व्हायरल केला आहे. असे असले तरी निवडणूक आयोगाने याची दखल घेतली असून यंत्रणा नियमावलीनुसार आपले काम करत असल्याचे म्हटले आहे. 

सुरेश प्रभू, एकनाथ शिंदेंपासूनचे बॅगा न तपासणी प्रकरण...
प्रचारावेळी नेत्यांच्या हेलिकॉप्टरमधून सर्रास बॅगा उतरत असतात. काही वर्षांपूर्वी सुरेश प्रभू मंत्री असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमधून बॅगा उतरविण्यात आल्या होत्या. यावेळी विरोधकांनी त्यांच्या बॅगा तपासण्याची मागणी केली होती. परंतू, बॅगांची तपासणी न झाल्याने राजकीय आरोप झाले होते. तसेच लोकसभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील बॅगा उतरविल्या होत्या. यावेळी देखील ठाकरे शिवसेनेने शिंदेंनी करोडो रुपये बॅगेतून नेल्याचा आरोप केला होता. यानंतरच्या दौऱ्यात शिंदेंची बॅग तपासण्यात आली होती, तेव्हा विरोधकांनी हा फार्स असल्याचे म्हटले होते. 
 

Web Title: Maharashtra Assembly Vidhan sabha Election Uddhav Thackeray's bag checked for second consecutive day; The Election Commission's reply came to the criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.