Maharashtra Assembly Winter Season: राज्यपालांच्या आक्षेपानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक न घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 01:57 PM2021-12-28T13:57:40+5:302021-12-28T14:12:15+5:30

Maharashtra Assembly Speaker Election: राज्यपालांच्या आदेशाविना निवडणूक घेतल्यास त्यामुळे घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता असल्याने विधानसभा अध्यक्षांची निवडणूक न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Maharashtra Assembly Winter Season: The decision of the state government not to hold the election of the Speaker of the Assembly after the objection of the Governor? | Maharashtra Assembly Winter Season: राज्यपालांच्या आक्षेपानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक न घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय?

Maharashtra Assembly Winter Season: राज्यपालांच्या आक्षेपानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक न घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय?

Next

मुंबई - रिक्त असलेल्या विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लांबवणीवर पडण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षांसाठी अवलंबण्यात आलेल्या निवड प्रक्रियेवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेप घेतल्याने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, राज्यपालांच्या आदेशाविना निवडणूक घेतल्यास त्यामुळे घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता असल्याने विधानसभा अध्यक्षांची निवडणूक न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक नियोजित होती. मतांची संभाव्य फूट टाळण्यासाठी अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने व्हावी, असा कायद्यात बदलही करण्यात आला. मात्र राज्यपालांनी या अध्यक्षीय निवडीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याने पेच निर्माण झाला. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यपालांच्या परवानगीविना अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पार पाडण्यास विरोध केला, त्यानंतर ही निवडणूक न घेण्याचा निर्णय झाला.

राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवर आक्षेप घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना एक खरमरीत पत्र पाठवले होते. तसेच अध्यक्षांची निवडणूक घेण्याबाबत सरकार ठाम भूमिकेत होतं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा एक बंद लिफाफ्यामधून पत्र पाठवलं. तसेच महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातही याविषयी चर्चा झाली, अखेरीस ही निवडणूक टाळण्याबाबत अंतिम निर्णय झाला.  

Web Title: Maharashtra Assembly Winter Season: The decision of the state government not to hold the election of the Speaker of the Assembly after the objection of the Governor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.