Maharashtra Bandh: ‘जनतेशी दादागिरी कराल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागतीलच’ MNSची Mahavikas Aghadiवर टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 02:49 PM2021-10-11T14:49:11+5:302021-10-11T14:49:54+5:30

Maharashtra Bandh: लखीमपूर हत्याकांडाला मनसेचा पाठिंबा आहे का? असा सवाल मनसेनं विचारला होता. त्याला आता मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी उत्तर दिलं आहे.

Maharashtra Bandh: 'If you bully the people, you will have to suffer the consequences' | Maharashtra Bandh: ‘जनतेशी दादागिरी कराल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागतीलच’ MNSची Mahavikas Aghadiवर टीका 

Maharashtra Bandh: ‘जनतेशी दादागिरी कराल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागतीलच’ MNSची Mahavikas Aghadiवर टीका 

Next

मुंबई - उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराविरोधात राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने आज राज्यव्यापी बंद पुकारला आहे. हा बंद यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून आक्रमक भूमिका घेण्यात आलेली आहे. दरम्यान, मनसेने मात्र या बंदला विरोध केला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मनसेवर टीका केली होती. लखीमपूर हत्याकांडाला मनसेचा पाठिंबा आहे का? असा सवाल मनसेनं विचारला होता. त्याला आता मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी उत्तर दिलं आहे.

अमेय खोपकर म्हणाले की, शेतकऱ्यांचा खरंच कळवळा असेल तर एक दिवसाचं उत्पन्न आंदोलनासाठी पाठवा. निषेध म्हणून दोन तास अधिक काम करा. जनतेशी दादागिरी कराल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागतीलच.

जनतेच्या जीवाशी खेळ करून राजकारणाची पोळी भाजण्याचा महाभकास आघाडीचा प्रयत्न सुरू आहे. उत्तर प्रदेशात शेतकरी आंदोलनात जो दुर्दैवी प्रकार झाला त्याचा कितीही निषेध केला तरी कमीच आहे, पण म्हणून ‘महाराष्ट्र बंद’ पुकारून राज्य सरकार काय साध्य करतंय? गाड्यांची तोडफोड करणारे, जबरदस्ती करुन दुकानं बंद करायला लावणारे ही गुंडशाही का आपल्या उरावर बसलेय? कोरोनातून आत्ता कुठे सगळे सावरत असताना जखमेवर मीठ चोळणारे किती विकृत मनोवृत्तीचे असतील, अशी टीका अमेय खोपकर यांनी केली. 

Web Title: Maharashtra Bandh: 'If you bully the people, you will have to suffer the consequences'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.