Maharashtra Bandh: Lakhimpur Kheri Violenceविरोधात Mahavikas Aghadiचा आज राज्यव्यापी बंद, विविध कामगार संघटनांचाही पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 07:07 AM2021-10-11T07:07:26+5:302021-10-11T07:09:16+5:30

Maharashtra Bandh: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या (Lakhimpur Kheri Violence) निषेधार्थ उद्या, सोमवारी महाविकास आघाडीने राज्यव्यापी ( Mahavikas Aghadi) बंद पुकारला आहे. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी पुकारलेल्या या बंदला भाजपविरोधातील सर्वच पक्ष, संस्थांसह विविध कामगार संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

Maharashtra Bandh: Mahavikas Aghadi Announced Maharashtra Bandh today, also supported by various trade unions | Maharashtra Bandh: Lakhimpur Kheri Violenceविरोधात Mahavikas Aghadiचा आज राज्यव्यापी बंद, विविध कामगार संघटनांचाही पाठिंबा

Maharashtra Bandh: Lakhimpur Kheri Violenceविरोधात Mahavikas Aghadiचा आज राज्यव्यापी बंद, विविध कामगार संघटनांचाही पाठिंबा

Next

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ उद्या, सोमवारी महाविकास आघाडीने राज्यव्यापी बंद पुकारला आहे. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी पुकारलेल्या या बंदला भाजपविरोधातील सर्वच पक्ष, संस्थांसह विविध कामगार संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे बंद परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, पक्षीय किंवा सरकारी दडपशाही करून कोणी व्यवहार बंद करण्याचा प्रयत्न केला, तर भाजप त्याला विरोध करेल, असे भाजपने म्हटले आहे. (Protesting the violence at Lakhimpur Kheri in Uttar Pradesh Mahavikas Aghadi Announced Maharashtra Bandh today)

नागरिकांनी शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून या आंदोलनाला सहकार्य करावे, असे आवाहन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने केले आहे. त्याला आघाडीतील सर्व घटकपक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. डावे पक्ष, संघटना, कामगार संघटना या बंदमध्ये सक्रियपणे सहभागी होणार आहेत. पीपल्स रिपब्लिकन पार्टीनेही बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलने बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.

 मुंबई, पुण्यात व्यापाऱ्यांचा पाठिंबा; विदर्भात मात्र विरोध
- दुपारी ३ पर्यंत दुकाने बंद ठेवणार असल्याचे पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका म्हणाले. तर मुंबईत शिवसेनेच्या विनंतीवरून व्यापारी ट्रेडर्स असोसिएशन चार वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवणार आहे.  
- विदर्भातील व्यापाऱ्यांवर बंदसाठी सक्ती करू नये, असे आवाहन नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने केले. 

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद
-रुग्णालये, रुग्णवाहिका, आरोग्य सेवेशी संबंधित आस्थापना आणि त्यांची वाहतूक, सरकारी कार्यालये, स्वच्छता यंत्रणांना बंदमधून वगळण्यात आले आहे.
-उर्वरित सर्व दुकाने, व्यापार, कारखाने, खासगी कार्यालये, हाॅटेल्स, ऑटो-टॅक्सी सेवा आदी बंद करण्याचा इशारा आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा बंदमध्ये सामील असणार नाही.

Web Title: Maharashtra Bandh: Mahavikas Aghadi Announced Maharashtra Bandh today, also supported by various trade unions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.