Maharashtra Bandh: खुर्ची टिकवण्यासाठी शिवसेना ‘बंद’मध्ये सहभागी; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 12:57 PM2021-10-11T12:57:26+5:302021-10-11T12:57:52+5:30

Lakhimpur Kheri Incident:  लखीमपूरमधील घटना वाईटच आहे. चौकशीनंतर कारवाईही होईल

Maharashtra Bandh: Shivsena participates in 'Bandh' cause of Sharad Pawar says BJP Chandrakant Patil | Maharashtra Bandh: खुर्ची टिकवण्यासाठी शिवसेना ‘बंद’मध्ये सहभागी; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा टोला

Maharashtra Bandh: खुर्ची टिकवण्यासाठी शिवसेना ‘बंद’मध्ये सहभागी; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा टोला

Next

कोल्हापूर - मंदिरे उघडली आहेत. नागरिक दर्शनासाठी बाहेर पडले आहेत. अनेक महिन्यांनी व्यवसाय सुरू आहेत. याचवेळी बंद करणं शिवसेनेला मान्य नव्हते. परंतू शरद पवारांनी सांगितल्यानंतर ‘खुर्ची’टिकवण्यासाठी शिवसेना बंदमध्ये सहभागी झाल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(BJP Chandrakant Patil) यांनी केला. 

‘बंद’च्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. पाटील म्हणाले, लखीमपूरमधील घटना वाईटच आहे. चौकशीनंतर कारवाईही होईल. याचवेळी शेतकऱ्यांनी प्रत्युत्तर देताना चौघांना ठेचून मारलं आहे. मावळमध्ये कॉंग्रेस,  राष्ट्रवादीचे सरकार असताना शोधून काढून अनेकांना मारले होते. महाराष्ट्रात सध्या आयकरचे जे छापे सुरू आहेत त्यावरून सुरू  झालेल्या चर्चेची दिशा बदलण्यासाठी हा ‘बंद’ पुकारला आहे. 

कर्जामाफीच्या ज्या घोषणा झाल्या, नंतर जी वादळे आली, महापूर आला त्यातून शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याची भरपाई आधी  शासनाने द्यावी आणि मग शेतकऱ्यांसाठी बंद करावेत. अजित पवार यांनीच विरोध केल्याने इंधन जीएसटीमध्ये  आले नाही. अन्यथा  पेट्रोल स्वस्त झाले असते असा दावा पाटील यांनी केला.

 

Web Title: Maharashtra Bandh: Shivsena participates in 'Bandh' cause of Sharad Pawar says BJP Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.