महाराष्ट्र बँक अपहार : ६ जणांविरुद्ध गुन्हे

By admin | Published: April 6, 2017 03:15 AM2017-04-06T03:15:51+5:302017-04-06T03:15:51+5:30

सहा आरोपी विरोधात फसवणुकीचा आणि माहिती तंत्रज्ञान कलाम ६६ (क) व (डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे

Maharashtra Bank Aphar: Crime against 6 People | महाराष्ट्र बँक अपहार : ६ जणांविरुद्ध गुन्हे

महाराष्ट्र बँक अपहार : ६ जणांविरुद्ध गुन्हे

Next

हितेन नाईक,
पालघर- येथील महाराष्ट्र बँकेच्या दोन शाखे मधून ५५ लाख १० हजाराच्या वर रक्कम यूपीआय सिस्टम प्रणालीने आॅनलाइन ट्रान्सफर होऊन मोठा घोटाळा केल्याप्रकरणी पोलिसांनी येथील सहा आरोपी विरोधात फसवणुकीचा आणि माहिती तंत्रज्ञान कलाम ६६ (क) व (डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. लोकमतने या फसवणूकीचे बिंग प्रथम फोडले होते.
नोटा बंदी नंतर कॅशलेस व्यवहारासाठी रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार नॅशनल पेमेंट कॉर्पोशन आॅफ इंडिया (एनपीसीआय) ने बँकांच्या विविध आॅनलाइन अ‍ॅप्स जनसुविधेसाठी व कॅशलेस व्यवहारासाठी अमलात आणले होते. ह्या नुसार बँकेच्या या अ‍ॅप्सद्वारे कुठेही जलदरीत्या पैसे पाठविण्याची आॅनलाइन प्रणाली ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली होती. महाअ‍ॅपचा गैरवापर करून येथील महाराष्ट्र बँकेतील ५५ लाख १० हजाराची रक्कम जतीन ज्ञानेश्वर संखे, अजमल हारून शेख, नाबिलाल कासीम शेख, प्रदीपकुमार रामदास गौतम, किसन गणपत हमद, उमाशंकर युवेश्वर पासवान या ग्राहकांच्या खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पालघर पोलिसांनी या सहाही विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
छोट्याशा चुकीमुळे महाराष्ट्र बँकेला इतका मोठा भुर्दंड सोसावा लागत असल्याचे प्राथमिक स्तरावरून दिसून येत आहे. आपल्या खात्यात ट्रान्सफर केलेले हे पैसे त्या ग्राहकांनी बँकेला न कळवता खर्च केले. आपल्या खात्यात जमा झालेले हे पैसे आपले नाहीत असे बँकेला कळवून ते परत करणे गरजेचे असतांना त्यांनी ते काढून वापरल्याने आता ते त्यांच्याकडून कसे वसूल करायचे असा प्रश्न बँकेला पडला होता. त्या रक्कमा वसूल करता याव्यात यासाठी महाराष्ट्र बँकेच्या मुख्य कार्यलयाद्वारे अशा ग्राहक आणि अन्य दोषी विरोधात कारवाई करण्यासाठी बँकेचे शाखा व्यवस्थापक जेम्स परेरा यांनी पालघर पोलिसा कडे तक्र ार केली होती.
अशा तांत्रिक चुका या आधीही औरंगाबाद, ठाणे, पुणे तर पालघर जिल्ह्यातील विरार आणि वालीव पोलीस स्टेशन अंतर्गत नोंदविण्यात आल्याची माहिती ह्या प्रकरणातील तपास अधिकारी संजय हजारे यांनी लोकमतला दिली.
>आज मुंबईत सायबर शाखेत महत्वाची बैठक
या प्रकरणातील बँकेचे पैसे हडप करणाऱ्या दोषीं विरोधात चौकशी करून पालघर पोलीसानी कारवाई करण्याची मागणी नागरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश दहिवले यांनी केली होती.
या प्रकरणाची योग्य उकल व्हावी ह्यासाठी उद्या मुंबईच्या सायबर गुन्हे शाखेत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असून राज्यातील ज्या पोलीस स्टेशन मध्ये असे गुन्हे दाखल झाले आहेत. त्या सर्व तपास अधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले आहे.
बँकेच्या पालघर शाखेतून सर्व तपशील मागविण्यात आले असून त्यानंतर या घोटाळ्यातील दोषींची माहिती पुढे येणार असल्याचे हजारे यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: Maharashtra Bank Aphar: Crime against 6 People

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.