महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष मुहनोत यांची हकालपट्टी
By admin | Published: September 27, 2016 05:46 AM2016-09-27T05:46:54+5:302016-09-27T05:46:54+5:30
महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत यांची केंद्र शासनाने कुठलेही कारण न देता तातडीने हकालपट्टी केली आहे़ त्यांच्या निवृत्तीला चार दिवस बाकी
पुणे : महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत यांची केंद्र शासनाने कुठलेही कारण न देता तातडीने हकालपट्टी केली आहे़ त्यांच्या निवृत्तीला चार दिवस बाकी असताना ही कारवाई झाली आहे़ त्यांच्या जागी रवींद्र मराठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ ते बँक आॅफ इंडियाचे कार्यकारी संचालक आहेत. मुहनोत यांची नोव्हेंबर २०१३ मध्ये अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती़ अध्यक्ष असताना त्यांनी पुण्यातील बंगल्याच्या नूतनीकरणासाठी मंजूर खर्चापेक्षा अधिक खर्च केला होता़ बँकेच्या अधिकारातील मुंबईतीलही एक निवासस्थान ताब्यात ठेवले होते़ अर्थमंत्रालयाने त्यांना नुकतीच ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती़