युपीआय अ‍ॅपच्यामाध्यमातून महाराष्ट्र बँकेची ६ कोटी ७ लाखाची फसवणूक

By Admin | Published: March 12, 2017 07:40 PM2017-03-12T19:40:42+5:302017-03-12T19:40:42+5:30

युपीआय अ‍ॅप्लीकेशनच्या माध्यमातून विविध बँकांच्या खात्यातून आॅनलाईन पैसे पळविण्याचा धडका सायबर गुन्हेगारांकडून सुरूच

Maharashtra Bank's 6 crore 7 lakh fraud by means of the UPA app | युपीआय अ‍ॅपच्यामाध्यमातून महाराष्ट्र बँकेची ६ कोटी ७ लाखाची फसवणूक

युपीआय अ‍ॅपच्यामाध्यमातून महाराष्ट्र बँकेची ६ कोटी ७ लाखाची फसवणूक

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 12 - युपीआय अ‍ॅप्लीकेशनच्या माध्यमातून विविध बँकांच्या खात्यातून आॅनलाईन पैसे पळविण्याचा धडका सायबर गुन्हेगारांकडून सुरूच आहे. यात सर्वाधिक फटका महाराष्ट्र बँकेला बसला आहे. महाराष्ट्र बँके ला सायबर गुन्हेगारांनी तब्बल ६ कोटी ७ लाख रुपयांचा आॅनलाईन चुना लावला. याप्रकरणी अखेर बँकेने ८८ खातेदार ग्राहकांविरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात फसवणुक आणि सायबर क्राईम कलमानुसार गुन्हा नोंदविला.
कॅशलेस व्यवहाराला शासनाने प्राधान्य दिले आहे. ग्राहकांनी जास्तीत जास्त व्यवहार आॅनलाईन करावे, यासाठी बँकांकडून ग्राहकांना आग्रह धरला जातो. मात्र, या आॅनलाईन सेवेचा लाभ देणाऱ्या युपीआय अ‍ॅप्लीकेशन बँका आणि ईमानदार ग्राहकांसाठी डोकंदुखी ठरली आहे. या अ‍ॅप्लीकेशनच्या माध्यमातून ग्राहकाच्या खात्यात एक रुपयाही नसला तरी त्याच्या मोबाईलचा वापर करुन ग्राहक एक लाखापर्यंतची रक्कम दुसऱ्या खात्यात आॅनलाईन वर्ग करू शकतो. ही बाब सायबर गुन्हेगारांनी हेरली आणि त्यांनी बँक ग्राहकांचा मोबाईल अथवा सीमकार्ड मिळवून त्यांच्या परस्पर बँकेला युपीआय अ‍ॅप्लीकेशनच्या मार्फत विनंती पाठवून जास्तीत जास्त रक्कम दुसऱ्या खात्यात वर्ग करून घेत आहेत. अशाप्रकारे महाराष्ट्र बँकेच्या विविध शाखांमधून सायबर गुन्हेगारांनी तब्बल ६कोटी ७लाख रुपये आॅनलाईन लुटले. ही बाब समोर येताच बँकांनी संबंधित ग्राहकांना नोटीसा पाठवून तात्काळ आॅनलाईन लुटलेली रक्कम बँकेत भरण्याचे कळविले. परंतु ग्राहकच त्यांची फसवणुक झाल्याची तक्रार करीत असल्याने शेवटी महाराष्ट्र बँकेचे विभागीय कार्यालयाने याप्रकरणी थेट एमआयडीसी सिडको ठाण्यात शनिवारी गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी तपास करीत आहेत.
कसे काम करते युपीआय अ‍ॅप्लीकेशन
अँड्राईड मोबाईलधारक प्ले स्टोअरमधून युपीआय अ‍ॅप्लीकेशन डाऊनलोड करून घेऊ शकतो. या अ‍ॅप्लीकेशनच्या माध्यमातून एका बँकेतून दुसऱ्या बँकेत आॅनलाईन पैसे वर्ग करता येते. ही सुविधा मोबाईलवरी प्लॅटफार्मवर उपलब्ध आहे. या अ‍ॅप्लीकेशनच्या माध्यमातून पैसे पाठविणे हे मेसेज पाठविण्याएवढं सोप काम आहे. यामुळे कोणीही या अ‍ॅप्लीकेशचा वापर करुन एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे सहज आणि काही सेकंदात वर्ग करू शकतो.

बँकेची फसवणूक आणि खातेदारांचाही विश्वासघात
बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणुक ही खातेदारांनीच केल्याचा बँकेचा दावा असला तरी प्रत्यक्षात मात्र यातील ८०टक्के खातेदारांनाचीच यात ओळखीच्याच लोकांनी विश्वासघाताने त्यांचा मोबाईल अथवा सीमकार्ड घेऊन ही आॅनलाईन लुट केली . यात बँक ग्राहकांचा मोहरा म्हणून सायबर गुन्हेगारांनी वापर केला. मात्र हा व्यवहार ज्या ग्राहकाच्या खातेदाराच्या मोबााईलवरुन झाला ते सर्वजण बँकेच्या लेखी गुन्हेगार आहेत.

Web Title: Maharashtra Bank's 6 crore 7 lakh fraud by means of the UPA app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.