बारावीचा आज निकाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 04:00 AM2020-07-16T04:00:38+5:302020-07-16T04:02:22+5:30
कोरोनामुळे लांबलेला इयत्ता बारावीचा निकाल केव्हा जाहीर केला जाणार याबाबत पालक व विद्यार्थ्यांमधील उत्सुकता चांगलीच ताणली गेली होती.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी दुपारी १ वाजता आॅनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना सर्व विषयांच्या गुणांच्या माहितीची प्रिंट आउट काढून घेता येणार आहे, असे राज्य मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी सांगितले आहे.
कोरोनामुळे लांबलेला इयत्ता बारावीचा निकाल केव्हा जाहीर केला जाणार याबाबत पालक व विद्यार्थ्यांमधील उत्सुकता चांगलीच ताणली गेली होती. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी १७ जुलै ते २७ जुलै या कालावधीपर्यंत व छायांकित प्रतीसाठी १७ ते ५ आॅगस्टपर्यंत आॅनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. आॅनलाईन अजार्साठीचे शुल्क डेबिट कार्ड ,क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग द्वारे भरता येईल.
उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांच्या आत विहित नमुन्यात विभागीय मंडळांकडे अर्ज करणे आवश्यक आहे.
या संकेतस्थळावर पाहता येईल निकाल...
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com