महाराष्ट्र बजेट 2019: सिंचन प्रकल्पांसाठी १२ हजार कोटींची तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 03:14 AM2019-06-19T03:14:35+5:302019-06-19T03:14:46+5:30
राज्यातील २६ अपूर्र्ण सिंचन प्रकल्पांचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यात आला असून सदर प्रकल्पांसाठी २२,३९८ कोटी रुपये लागणार आहेत.
मुंबई : राज्यातील २६ अपूर्र्ण सिंचन प्रकल्पांचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यात आला असून सदर प्रकल्पांसाठी २२,३९८ कोटी रुपये लागणार आहेत. त्यापैकी ३,१३८ कोटी केंद्रीय अर्थसंकल्पातून मिळणार आहेत. तसेच सिंचन प्रकल्पांसाठी १२,५९७ कोटी एवढी तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पातील तरतुदी
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प डिसेंबर २०२१ पर्यत पूर्ण करण्याचे नियोजन.
प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेसाठी 2,720 कोटी
बळीराजा जलसंजिवनी योजनेकरीता 1,531 कोटी
जलयुक्त शिवार अभियानातंर्गत ६ लाख २ हजार मृद व जलसंधारणाची कामे पूर्ण. त्यातून २६.९० टीएमसी पाणीसाठा क्षमता निर्माण, या योजनेवर 8,946 कोटी खर्च.
मृद व जलसंधारण विभागाकरीता रु. 3,182.28 कोटी
मागेल त्याला शेततळे या योजनेतंर्गत २५ हजार शेततळी पूर्ण करण्यासाठी 125 कोटी
सुक्ष्म सिंचनासाठी 350 कोटींची तरतूद.
रस्ते विकास व बांधकाम विभाग
रस्ते विकास योजनेतंर्गत सन २००१-२०२१ मध्ये एकूण ३,३६,९९४ किमी लांबीच्या रस्त्यांचे उद्दिष्ट, आतापर्यत २,९९,४४६ किमी पेक्षा जास्त लांबीचे रस्ते विकसित.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत ८,८१९ किमी लांबीची कामे पूर्ण, उर्वरित २० हजार २५७ किमी लांबीची कामे प्रगतीपथावर.
नागपूर- मुंबई समृध्दी महामार्गाचे काम जलदगतीने सुरु, बांधकामाचे १६ पॅकेजेस् मध्ये नियोजन, पैकी १४ पॅकेजेसचे कायार्रंभ आदेश दिले गेले.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे अंतर कमी करण्याच्या प्रकल्पावर रु. 6,695 कोटी इतका खर्च अपेक्षित.
सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पुल ३ च्या बांधकामासाठी 775.58 कोटीच्या कामास प्रशासकीय मान्यता.
11,332.82 कोटीच्या वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाचे काम प्रगतीपथावर, काम ५ वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन.
१२ बलुतेदारांसाठी शंभर कोटी
ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्रमुख घटक असलेल्या १२ बलुतेदारांच्या सक्षमीकरणासाठी खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत कुटीरोद्योग, लघुद्योग यांना प्रोत्साहन देणार, यासाठी 100 कोटी निधी राखीव.
ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या मानधनामध्ये लक्षणीय वाढ करण्यासाठी २०० कोटी इतका निधी राखीव.
तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकांचे आधुनिकीकरण. यासाठी १०० कोटी
म. रा. मार्ग परिवहन महामंडळास ७०० नवीन बसेस खरेदी करण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय, चालू आर्थिक वर्षात १६० कोटी
मुंबईतील एशियाटीक ग्रंथालयाच्या डिजिटायजेनसाठी ५ कोटी
कला आणि क्रीडा क्षेत्र
मुंबई विद्यापीठात कै. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टूडंटन्ड युथ मुव्हमेंट नावाचे केंद्र स्थापन करणार.
दृष्य कलेच्या क्षेत्रात महत्वाचे योगदान देणाऱ्या नामवंत व ज्येष्ठ कलाकारांचा यथोचित सन्मान करण्यासाठी कै. वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार देण्याचा निर्णय.
सर जे.जे. कला, वास्तुशास्त्र आणि उपयोजित कला या महाविद्यालयांच्या आवश्यक सुविधांसाठी १५० कोटी निधी देण्याचा निर्णय, चालू आर्थिक वर्षात २५ कोटींची तरतूद.
औरंगाबाद जिल्हयातील करोडी येथे राज्यस्तरीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार तसेच वाळुंज, जि. औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिडांगण तयार करणार.
आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागासाठी 3,980.87कोटी
सार्वजनिक आरोग्य विभागाकरिता 10,581.79कोटी
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेअंतर्गत मिळणाºया अनुदानात ६०० रुपयावरून १००० रुपये वाढ
वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर या दारूबंदी असलेल्या जिल्हयांमध्ये व्यसनमुक्तीचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी चालू आर्थिक वर्षात ५० कोटी रू. राखीव.
शिक्षण व सामाजिक न्याय
इतर मागासवर्ग (ओ.बी.सी.) लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळास 200 कोटी.
इतर मागास प्रवर्गातील मुलांसाठी १८ आणि मुलींसाठी १८ अशी एकूण ३६ वसतीगृहे सुरू करणार
५ वी ते १० वीत शिकणाºया इतर मागास प्रवर्गातील मुलींसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना
राज्यातील गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया या जिल्हयांच्या नक्षलग्रस्त भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकासाचा विशेष कार्यक्रम राबविणार, तीन वर्षात 500 कोटी रू. निधी उपलब्ध करणार, यावर्षी १५० कोटी राखीव.
इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत राज्यातून व विभागातून सर्वप्रथम येणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिंनींना स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्काराने गौरविणार.
१ लक्ष व ५१ हजार रुपयांचे रोख पुरस्कार
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी 100 कोटी रू. राखीव.
विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी स्वयंरोजगार योजना तयार करण्याचा निर्णय, यासाठी पहिल्या वर्षी २०० कोटी.
कोतवालांच्या मानधनात ५० टक्केपेक्षा अधिकची वाढ, गट ड च्या पद भरतीमध्ये ४० टक्के पदे कोतवालांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय.
नागपूर व अमरावती विभागातील लिलावाद्वारे अथवा अन्य प्रकारे भाडे तत्वावर दिलेल्या जमिनींचे मालकी हक्क देण्यासाठी फ्रि-होल्ड करण्याचा निर्णय.
पर्यटन विकास
शिर्डी येथे येणाºया भाविकांच्या सुरक्षेसाठी गृह, नगरविकास, परिवहन विभाग तसेच शिर्डी संस्थान यांच्या समन्वयातून पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय तसेच सिंधुदूर्ग, औरंगाबाद व नागपूर या तीन जिल्हयात आणि शिर्डी, मुंबई येथे पर्यटन पोलीस ही संकल्पना राबविण्याचा निर्णय. तरतूद नाही.
सिंधुदूर्ग जिल्हयातील सावंतवाडी येथे सुरक्षा रक्षक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय.
रायगड किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्याकरिता रू. 606 कोटी
महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान आंबेगाव (बु.), ता. हवेली, जि. पुणे येथे युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील शिवसृष्टी प्रकल्पाच्या निर्मितीसाठी यावर्षी ५० कोटी निधी देणार.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेसाठी मुदत ठेवीमध्ये आणखी १० कोटींची तरतूद, या योजनेसाठी २५ कोटी
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ अंदाजे ८ हजार पत्रकारांना होणार असून विमा हप्त्यासाठी आवश्यक निधी.