Maharashtra Budget, Shivaji Maharaj | जय भवानी, जय शिवाजी! शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी अर्थसंकल्पातून ३५० कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 02:45 PM2023-03-09T14:45:14+5:302023-03-09T14:46:05+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत विविध योजनांची घोषणा

Maharashtra Budget 2023 by Devendra Fadnavis 350 crore provision for Shiv Rajyabhishek celebration festival in the budget | Maharashtra Budget, Shivaji Maharaj | जय भवानी, जय शिवाजी! शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी अर्थसंकल्पातून ३५० कोटी!

Maharashtra Budget, Shivaji Maharaj | जय भवानी, जय शिवाजी! शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी अर्थसंकल्पातून ३५० कोटी!

googlenewsNext

Maharashtra Budget 2023, Ch Shivaji Maharaj: महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी सुरू असताना, आज राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर २०१९ ते २०२२ या काळात विरोधी पक्षनेते म्हणूनही कार्यरत राहिले. पण आज पहिल्यांदाच फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या वेळी आजच्या अर्थसंकल्पातून राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला सलाम करत, या संदर्भातील अनेक मोठ्या घोषणा केल्या.

राज्य सरकारचं अर्थसंकल्पात 'जय शिवाजी'!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष आहे त्यामुळे या महोत्सवासाठी तब्बल ३५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केली. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारण्यासाठी सुमारे ५० कोटींचा निधी देण्यात येणार आहे. मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील शिवचरित्रावरील उद्यानांसाठी अंदाजे  २५० कोटी रुपयांची मदत फडणवीसांनी जाहीर केली. तसेच, शिवरायांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय उभे केले जाणार असून शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी तब्बल ३०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे, अशी घोषणा फडणवीसांनी अर्थसंकल्पात जाहीर केला.

शेतकऱ्यांसाठीही विशेष मदत!

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता एकूण १२ हजार रूपयांचा सन्माननिधी मिळणार आहे. केंद्र सरकारच्या ६ हजारांच्या मदतीला राज्य सरकार आणखी सहा हजार रुपये देणार आहे. आमच्या पहिल्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी योजना पुन्हा चालू केली जाणार आहे. मधल्या काळात ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाले नाहीत त्या शेतकऱ्यांना याचे लाभ दिले जाणार आहे. मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात येत आहे. मागेल त्याला फळबाग, ठिबक, हरितगृह आदींसाठी १००० कोटींचा निधी देण्यात येणार आहे. कोकणात काजू, बोंडू प्रक्रिया केंद्र उभारणार. काजू फळ विकास योजना आजरा आणि चंदगडमध्ये योजना राबविण्यात येणार आहे. तसेच अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबास दोन लाखांपर्यंत सानुग्रह अनुदान दिले जाईल, असेही फडणवीसांनी जाहीर केले.

Web Title: Maharashtra Budget 2023 by Devendra Fadnavis 350 crore provision for Shiv Rajyabhishek celebration festival in the budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.