Maharashtra Budget Breaking News: मोठी बातमी! शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणेच वर्षाला सहा हजार रुपये मिळणार; फडणवीसांकडून नवी योजना जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 02:24 PM2023-03-09T14:24:00+5:302023-03-09T14:48:58+5:30

Maharashtra Budget Live Updates: अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित असल्याचे फडणवीस म्हणाले.

Maharashtra Budget Breaking News:Farmers will get Rs 6,000 per year like the Centre Pm Kisan Yojana; New scheme announced by Devendra Fadnavis | Maharashtra Budget Breaking News: मोठी बातमी! शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणेच वर्षाला सहा हजार रुपये मिळणार; फडणवीसांकडून नवी योजना जाहीर

Maharashtra Budget Breaking News: मोठी बातमी! शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणेच वर्षाला सहा हजार रुपये मिळणार; फडणवीसांकडून नवी योजना जाहीर

googlenewsNext

राज्याच्या अर्थसंकल्पाला सुरुवात झाली असून अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात शेतकऱ्यांपासून केली आहे. यामध्ये राज्य सरकारकडून केंद्राच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर करण्यात आली आहे. तसेच शेतीसाठी विविथध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. 

Maharashtra Budget: विमा कंपन्यांच्या जोखडातून शेतकऱ्यांना सोडविले; केवळ 1 रुपयांत पीकविमा, उरलेले राज्य सरकार भरणार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान: 50 कोटी दिले जाणार आहेत. मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने : 250 कोटी रुपये, शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय. शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन : 300 कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे फडणवीस म्हणाले. 

अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित असल्याचे फडणवीस म्हणाले. शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा,  पर्यावरणपूरक विकास आदी करण्यात येणार आहे. 

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता एकूण 12,000 रुपयांचा सन्माननिधी मिळणार आहे. केंद्र सरकारच्या ६ हजारांच्या मदतीला राज्य सरकार आणखी सहा हजार रुपये देणार आहे. आमच्या पहिल्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी योजना पुन्हा चालू केली जाणार आहे. मधल्या काळात ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाले नाहीत त्या शेतकऱ्यांना याचे लाभ दिले जाणार, असल्याचे फडणवीस म्हणाले. 

मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात येत आहे. मागेल त्याला फळबाग, ठिबक, हरितगृह आदींसाठी १००० कोटींचा निधी देण्यात येणार आहे. कोकणात काजू, बोंडू प्रक्रिया केंद्र उभारणार असल्याचे फडणवीस म्हणाले. काजू फळ विकास योजना आजरा आणि चंदगडमध्ये योजना राबविण्यात येणार आहे. तसेच अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबास दोन लाखांपर्यंत सानुग्रह अनुदान दिले जाईल, असेही फडणवीस म्हणाले. 

Web Title: Maharashtra Budget Breaking News:Farmers will get Rs 6,000 per year like the Centre Pm Kisan Yojana; New scheme announced by Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.