Maharashtra Budget : फडणवीसांचं धनगर समाजाला मोठं गिफ्ट, बिनव्याजी मिळणार इतक्या कोटींचे कर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 03:02 PM2023-03-09T15:02:13+5:302023-03-09T17:06:44+5:30

Maharashtra Budget : राज्यातील धनगर समाजासाठी 1000 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. 

Maharashtra Budget : Devendra Fadnavis's big gift to Dhangar Samaj, interest-free loan of so many crores, maharashtra budget live updates | Maharashtra Budget : फडणवीसांचं धनगर समाजाला मोठं गिफ्ट, बिनव्याजी मिळणार इतक्या कोटींचे कर्ज 

Maharashtra Budget : फडणवीसांचं धनगर समाजाला मोठं गिफ्ट, बिनव्याजी मिळणार इतक्या कोटींचे कर्ज 

googlenewsNext

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. याचबरोबर, राज्यातील धनगर समाजासाठी 1000 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. 

10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार येणार आहे. महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल. तसेच, 22 योजनांचे एकत्रिकरण, मंत्रिमंडळ शक्तीप्रदत्त समितीमार्फत अंमलबजावणी केली जाणार आहे. यासाठी अहमदनगर येथे मुख्यालय असणार आहे. याशिवाय, राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत मेंढीपालनासाठी भरीव निधी दिला जाणार आहे, असे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

याचबरोबर, या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी सुद्धा मोठ्या घोषणा केल्या आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठी आता केवळ 1 रुपयांत पीकविमा दिला जाणार आहे. आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून घेतली जात होती. आता शेतकऱ्यांवर कोणताच भार राहणार नाही. त्यामुळे आता राज्य सरकार हप्ता भरणार आहे. यामुळे 3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्यांकडून राबवली जात होती. मात्र, आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना नावाने राज्य सरकारकडून राबविण्यात येईल. त्यामुळे शेतकर्‍यांचा पूर्ण त्रास वाचणार आहे. अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या 1 लाखाहून आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे.

Web Title: Maharashtra Budget : Devendra Fadnavis's big gift to Dhangar Samaj, interest-free loan of so many crores, maharashtra budget live updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.