Maharashtra Budget: विमा कंपन्यांच्या जोखडातून शेतकऱ्यांना सोडविले; केवळ 1 रुपयांत पीकविमा, उरलेले राज्य सरकार भरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 02:45 PM2023-03-09T14:45:27+5:302023-03-09T14:45:49+5:30
Maharashtra Budget For Farmers Update: आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्यांकडून घेतली जात होती. आता शेतकर्यांवर कोणताच भार नाही.
गेल्या काही वर्षांपासून बळीराजा संकटात आहे. पिक विम्याची रक्कम भरूनही त्याला संकटे आल्यावर विमा मिळत नव्हता. यामुळे विमा नको पण विमा कंपन्यांना आवरा अशी परिस्थिती झाली होती. यावर शिंदे-फडणवीस सरकारने तोडगा काढला आहे. राज्यातील शेतकर्यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा मिळणार आहे.
आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्यांकडून घेतली जात होती. आता शेतकर्यांवर कोणताच भार नाही. राज्य सरकार हप्ता भरणार असून 3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार आहे.
- राज्यातील शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान राबविणार
- पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत
- तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना
- एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार
- 5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार
- 2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकर्यांना योजनेचे लाभ देणार
- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले.
- 12.84 लाख पात्र शेतकर्यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट जमा.
गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून, लाभही 2 लाखांपर्यंत
- गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्यांकडून
- आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
- ही योजना राज्य सरकार राबविणार, त्यामुळे शेतकर्यांचा पूर्ण त्रास वाचणार
- अपघातग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या 1 लाखाहून आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन
- नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार
- 3 वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणणार
- 1000 जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करणार
- डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्तीवाढ
- 3 वर्षांत 1000 कोटी रुपये निधी