Maharashtra Budget Session 2022 : "दाऊदच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या"; नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 11:34 AM2022-03-03T11:34:53+5:302022-03-03T11:45:41+5:30

Maharashtra Budget Session 2022 : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात गोंधळ झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भाषणावेळी सत्ताधारी पक्षाने गोंधळ घातला.

Maharashtra Budget Session 2022 bjp protest for demand Nawab Malik resignation | Maharashtra Budget Session 2022 : "दाऊदच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या"; नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक

फोटो - दत्ता खेडेकर

Next

मुंबई – राज्याच्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget Session 2022) सुरुवात झाली आहे. नवाब मलिकांना ईडीची अटक, एसटी महामंडळाचं विलिनीकरण, मराठा आरक्षण यासारख्या विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात गोंधळ झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भाषणावेळी सत्ताधारी पक्षाने गोंधळ घातला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून सभागृहात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे राज्यपालांनी अवघ्या काही मिनिटांत अभिभाषण आटोपतं घेतलं. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपा (BJP) आमदार आक्रमक झाले आहेत. नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्यासाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. भाजपा आमदारांच्या हातात काही पोस्टर्स होते. या पोस्टर्सवर नवाब मलिक आणि दाऊद इब्राहिमचा फोटो सुद्धा होता. "दाऊदच्या मंत्र्याचा राजीनामा घ्या" असा उल्लेखही या पोस्टर्सवर आहे. विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, अतुल भातखळकर, देवेंद्र फडणवीस आदी नेते उपस्थित होते. राज्य विधिमंडळाच्या आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपा आणि मित्रपक्षांची एक बैठक बुधवारी मुंबई येथे झाली. त्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधत सरकारवर हल्लाबोल केला होता.

मलिकांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होणारच, पण...; फडणवीसांचा हल्लाबोल

दाऊद इब्राहिम, अंडरवर्ल्डशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांना वाचवायला अख्खे सरकार उभे आहे. देशात असे कधी घडले नाही. ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे आहेत, ते मुंबईच्या खून्यांशी व्यवहार करणाऱ्या सोबत राहतात, हेही पाहतो आहोत. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होणारच. पण आम्हाला चर्चेत रस, अनेक मुद्दे मांडणार, चर्चा सुद्धा करणार. शेतकरी हवालदिल आहे, पण त्याची वीज कापली जाते आहे. अजित पवार यांनी दोन वेळा वीज न कापण्याबाबत शब्द दिला, पण त्यांचे कुणी ऐकत नाही असा आरोप फडणवीसांनी केला. 

असे फुसके बार काय वादळ उठवणार?; शिवसेनेचा भाजपाला टोला

विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन गाजेल, वाजेल किंवा वादळी ठरेल, अशी हूल विरोधी पक्षांतर्फे उठवली जात आहे. त्यात अजिबात तथ्य दिसत नाही. विरोधी पक्षांच्या लोकांनी आरोपांची राळ उडवायची व त्यातून वादळ उभे करायचे दिवस आता राहिलेले नाहीत. कारण विरोधकांचे आरोप द्वेषपूर्ण असतात. त्यामुळे ते आपटीबारही ठरत नाहीत. असे फुसके बार काय वादळ उठवणार? अशा शब्दात शिवसेनेनं अधिवेशनापूर्वी विरोधी पक्ष भाजपाला टोला लगावला आहे. 

Web Title: Maharashtra Budget Session 2022 bjp protest for demand Nawab Malik resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.