Maharashtra Budget Session 2022: 'आज बाळासाहेब असते तर एका मिनिटात…', नवाब मलिक प्रकरणावरुन फडणवीसांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 03:30 PM2022-03-03T15:30:33+5:302022-03-03T15:30:40+5:30

Maharashtra Budget Session 2022 : 'नवाब मलिकांचे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे उघड झाले झाले, तरीदेखील ते अद्याप मंत्रीपदावर आहेत.'

Maharashtra Budget Session 2022 | Devendra Fadnavis | Nawab Malik | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis slams Uddhav Thackeray over Nawab Malik matter | Maharashtra Budget Session 2022: 'आज बाळासाहेब असते तर एका मिनिटात…', नवाब मलिक प्रकरणावरुन फडणवीसांची टीका

Maharashtra Budget Session 2022: 'आज बाळासाहेब असते तर एका मिनिटात…', नवाब मलिक प्रकरणावरुन फडणवीसांची टीका

Next

मुंबई: आज राज्याच्या अर्थसंक्पीय अधिवेशनाला(Maharashtra Budget Session 2022) सुरुवात झाली आहे. आज पहिल्याच दिवशी भाजपने नवाब मलिक(Nawab Malik) प्रकरणावरुन सरकारला धारेवर धरले. मलिक यांना दिवसांपूर्वीच ईडी(ED)ने अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाने लावून धरली आहे. विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 

'मंत्र्याचे दाऊदशी संबंध'
मीडियाशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिक प्रकरणावरुन सरकारवर निशाणा साधला. 'इतिहासात असे कधीच घडले नाही. मुंबईत बॉम्बस्फोट झाले, त्या स्फोटाचा आरोपी दाऊद याच्यासोबत व्यवहार केल्याचा आणि त्याची बहिण हसीना पारकरला पैसे दिल्याचा मंत्र्यावर आरोप आहे. त्यासाठी त्यांना अटकही झाली आहे, पण हा माणूस मंत्रीपदावर राहातो, हे नैतिकतेला धरून नाही', अशी टीका फडणवीसांनी केली.

'आज बाळासाहेब असते तर...'
फडणवीस पुढे म्हणाले की, 'मुंबईचे अपराधी, ज्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट केला, अशा लोकांकडून फक्त जमीन घेतली असं नाही तर 55 लाख रुपये हसीना पारकरला दिले. हसीना पारकर ही दाऊदची बहीण आहे. त्याच्या बहिणीला पैसे देणं म्हणजे त्यानंतर झालेल्या बॉम्बस्फोटात जे लोक सामील आहेत, त्यांना मदत करण्यासारखेच आहे. आज हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते, तर एका मिनिटात त्यांची हकालपट्टी केली असती,' असंही फडणवीस म्हणाले.

'हे तर दाऊद शरण सरकार...'
'प्रकरण उघडकीस आल्यानंतर सरकार मंत्र्याच्या पाठिशी उभं राहात असेल, तर हे दाऊद शरण सरकार आहे असंच म्हणावं लागेल. संजय राठोड जेलमध्ये गेले नव्हते, तरीही तुम्ही नैतिकतेच्या आधारावर त्यांचा राजीनामा घेतला. आता नवाब मलिक जेलमध्ये असून त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. तरी त्यांना वाचवण्याचे काय कारण? कुणाच्या दबावाखाली नवाब मलिकांना वाचवलं जात आहे?' असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी विचारला.

Web Title: Maharashtra Budget Session 2022 | Devendra Fadnavis | Nawab Malik | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis slams Uddhav Thackeray over Nawab Malik matter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.