'महाराष्ट्रात दोनच गुंडे, कोकाटे आणि मुंडे'; अधिवेशनात उमटले पडसाद, विरोधकांची घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 15:20 IST2025-03-03T15:18:39+5:302025-03-03T15:20:31+5:30
Dhananjay Munde Manikrao Kokate: धनंजय मुंडे आणि माणिकराव मुंडे या दोन मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाल्याचे दिसले.

'महाराष्ट्रात दोनच गुंडे, कोकाटे आणि मुंडे'; अधिवेशनात उमटले पडसाद, विरोधकांची घोषणाबाजी
Dhananjay munde manikrao kokate News: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अपेक्षेप्रमाणे धनंजय मु्ंडे आणि माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणाचे पडसाद दोन्ही सभागृहात उमटले. दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात यावे, अशी आग्रही मागणी विरोधकांकडून विधानसभा आणि विधान परिषदेत करण्यात आली. त्यापूर्वी विधानभवन परिसरात विरोधकांनी मुंडे आणि कोकाटेंना गुंड म्हणत घोषणाबाजी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. पहिल्याच दिवशी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मुद्दा तापला. विधानभवनात आल्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात घोषणा दिल्या.
महाराष्ट्रात दोनच गुंडे, कोकाटे आणि मुंडे
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह काँग्रेस, शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी निदर्शने केली.
यावेळी 'महाराष्ट्रात दोनच गुंडे, कोकाटे-मुंडे, कोकाटे मुंडे', अशा घोषणा आमदारांनी देत माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली.
महाराष्ट्र में दो है गुंडे,
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) March 3, 2025
कोकाटे - मुंडे - कोकाटे मुंडे!
मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात यावा, या मागणीसाठी आज विधानभवन परिसरात आंदोलन. pic.twitter.com/jKuzthK43V
धनंजय मुंडेंनी घेतली फडणवीसांची भेट
दरम्यान, विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये १५-२० मिनिटं चर्चा झाली.
दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांचीही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत भेट झाली. या दोन्ही भेटींची विधानभवन परिसरात आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.