Devendra Fadnavis: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे ‘टोमणे बॉम्ब’ जो सगळ्यांवर भारी; देवेंद्र फडणवीसांनी उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 06:28 PM2022-03-25T18:28:29+5:302022-03-25T18:29:06+5:30

ऑक्सिजन खरेदीमध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याचे उत्तर नाही. २४ महिन्यात ३६ मालमत्ता कशा यशवंत जाधव यांनी कशा कमावल्या त्याचे उत्तर नाही. अशा विविध मुद्द्यांवर फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत सभात्याग केला.

Maharashtra Budget Session: BJP Devendra Fadnavis criticized CM Uddhav Thackeray | Devendra Fadnavis: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे ‘टोमणे बॉम्ब’ जो सगळ्यांवर भारी; देवेंद्र फडणवीसांनी उडवली खिल्ली

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे ‘टोमणे बॉम्ब’ जो सगळ्यांवर भारी; देवेंद्र फडणवीसांनी उडवली खिल्ली

Next

मुंबई – सध्या रशिया-यूक्रेन युद्ध सुरू आहे. यूक्रेनच्या राष्ट्रपती नाटोकडे मदत मागतायेत. त्याऐवजी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मदत मागितली असती तर बरं झालं असते. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असं शस्त्र आहे. असा बॉम्ब आहे जो सगळ्यांवर भारी आहे. तो म्हणजे ‘टोमणे बॉम्ब’. टोमण्यांशिवाय त्यांच्या भाषणात काहीच नव्हतं अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या(CM Uddhav Thackeray) भाषणाची खिल्ली उडवली आहे.

देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले की,  मराठी शाळा बंद झाल्या त्याबद्दल बोलले नाही. कोविड काळात सर्वात जास्त रुग्ण आणि मृत्यू झाले त्यावर काही बोलले नाहीत. नवाब मलिकांचे समर्थन उद्धव ठाकरे करतायेत त्याचे मनातून दु:खं आहे. बाकी जाऊ द्या. नवाब मलिक यांनी बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन खरेदी केली. जो आरोपी आजही जेलमध्ये आहे. खोट्या कागदपत्राच्या आधारे दहशतवाद्याशी व्यवहार करतायेत. ते पैसे हसीना पारकरला चाललेत. या गोष्टींचे समर्थन ते करतात. त्याचे अतिशय दु:ख आहे असं त्यांनी म्हटलं.

तसेच ऑक्सिजन खरेदीमध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याचे उत्तर नाही. २४ महिन्यात ३६ मालमत्ता कशा यशवंत जाधव यांनी कशा कमावल्या त्याचे उत्तर नाही. २९ कोटींचे टॅब खरेदी घोटाळा त्याचे उत्तर नाही. भायखळा प्राणी संग्रहालयाच्या टेंडरमध्ये ६ कोटींची वाढ झाली त्याचे उत्तर नाही. बिल्डरच्या लाभासाठी उद्योनाचं आरक्षण बदललं त्याचे उत्तर नाही. झोपडपट्टी असलेल्या जागेवर बिल्डरचा पैसे दिले. त्याचे उत्तर नाही. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले नाही. हे भाषण विधानसभेतलं होतं. पण शिवाजी पार्कचं भाषण झालं. त्यामुळे आम्ही या सरकारचा निषेध म्हणून सभात्याग करतो. असा आरोप करत देवेंद्र फडणवीसांसह भाजपा आमदारांनी सभात्याग केला.  

शिखंडी उल्लेखाचाही घेतला समाचार

शिखंडीचा उल्लेख करता निवडणुकीत मोदींसोबत तुम्ही मतं मागितली मग सत्तेसाठी कोणत्या शकोनीच्या नादी लागला? मग शिखंडी कोण? शिखंडीला पुढे करणारी आम्ही औलाद नाही. आम्ही समोर लढणारे लोकं आहोत. प्रभू श्रीकृष्ण, रामचंद्राचं नाव सांगणारे आहोत. कपटाने राज्य कौरवाने घेतले होते पांडवांनी नाही. आमच्यासाठी सत्ता अंतिम लक्ष्य नाही असं जोरदार प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे.    

Web Title: Maharashtra Budget Session: BJP Devendra Fadnavis criticized CM Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.