Maharashtra Budget Session: आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात; नाव न घेता पवार कुटुंबावर लावले आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 11:34 AM2022-03-16T11:34:51+5:302022-03-16T11:35:18+5:30

ओबीसी भटक्या विमुक्तांच्या न्याय हक्काचं, ओबीसी आरक्षणाचं, महाज्योतीचं कुणी पानिपत करणार असेल तर आपण सुभेदार बनून उभे राहूया. एकत्र लढूया, एकत्र जिंकूया असंही पडळकर म्हणाले

Maharashtra Budget Session: BJP MLC Gopichand Padalkar Allegations over OBC Reservation Politics | Maharashtra Budget Session: आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात; नाव न घेता पवार कुटुंबावर लावले आरोप

Maharashtra Budget Session: आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात; नाव न घेता पवार कुटुंबावर लावले आरोप

Next

मुंबई – महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी आरक्षणावरून सत्ताधारी पक्षाला विशेषत: पवार कुटुंबीयांना पुन्हा लक्ष्य केले आहे. बहुजनांनी यांना मुजरा करत दादा-साहेब-युवराज करत राहवं, म्हणजे तुमची जास्तीत जास्त जिल्हापरिषदेवर बोळवण होईल. हा डाव आपण ओळखला पाहिजे असं आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalakar) सांगत अप्रत्यक्षपणे शरद पवार-अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे.  

विधान भवनात प्रवेश करताना हाती झेंडा घेतला होता परंतु त्यांना गेटवरच अडवण्यात आले. याबाबत गोपीचंद पडळकर म्हणाले की, पानिपतच्या पराभवानंतर स्वराज्याचा भगवा पताका थोरले सुभेदार मल्हाराव होळकर यांनी खांद्यावर पेलला. पानीपतच्या पराभवाचं रुपांतर त्यांनी प्रभावात केलं. मुघलशाही आपल्या टाचेखाली घेतली, जिथं 'मल्हार आया भागो' म्हणत मुघलांच्या सैनिकांची भंबेरी उडायची, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची ताकद अटकपासून कटकपर्यंत पसरवली. प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेल्या लेखकांनी होळकरांचा दैदिप्यमान इतिहास पुसायची मोहिम चालवली असा आरोप त्यांनी केला आहे.

तसेच वाफगावच्या किल्ल्यावरून हे ओळखलेच आहे. हा संघर्षाचा पराक्रमाचा इतिहास जर आम्हा बहुजन बांधवाना परत कळाला तर आम्ही इथली शासनकर्ती जमात होऊ, आम्ही आमचा राजकीय हक्क मागायला येऊ. ते येथल्या काका-पुतण्या धार्जिण्या राजकारण्यांना होऊ द्यायचं नाहीये. होळकरशाहीचे संस्थापक थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्व बहुजन धनगर भटक्या ओबीसी बांधवांनी आपला राजकीय न्युनगंड झुगारून आपला अधिकार घेण्याचा प्रण केला पाहिजे. मल्हारावांप्रमाणे मुत्सदीपणा शिकला पाहिजे असं आवाहन गोपीचंद पडळकरांनी बहुजनांना केले. दरम्यान, ओबीसी भटक्या विमुक्तांच्या न्याय हक्काचं, ओबीसी आरक्षणाचं, महाज्योतीचं कुणी पानिपत करणार असेल तर आपण सुभेदार बनून उभे राहूया. एकत्र लढूया, एकत्र जिंकूया असंही पडळकर म्हणाले आहेत.

Web Title: Maharashtra Budget Session: BJP MLC Gopichand Padalkar Allegations over OBC Reservation Politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.