Maharashtra Budget Session: फडणवीस मुख्यमंत्री असताना तपास झाला असता तर...; मलिकांच्या अटकेवरून गृहमंत्र्यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 06:47 PM2022-03-14T18:47:23+5:302022-03-14T18:48:17+5:30

Maharashtra Budget Session: देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना गृहमंत्री वळसे पाटील यांच्याकडून प्रत्युत्तर

Maharashtra Budget Session home minister dilip walse patil questions devendra fadnavis | Maharashtra Budget Session: फडणवीस मुख्यमंत्री असताना तपास झाला असता तर...; मलिकांच्या अटकेवरून गृहमंत्र्यांचा टोला

Maharashtra Budget Session: फडणवीस मुख्यमंत्री असताना तपास झाला असता तर...; मलिकांच्या अटकेवरून गृहमंत्र्यांचा टोला

googlenewsNext

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केलेल्या आरोपांना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर, मंत्री नवाब मलिक यांना झालेली अटक यावर पाटील यांनी भाष्य केलं. विधानसभेत सातत्यानं पेन ड्राईव्ह आणणाऱ्या फडणवीस यांनी डिटेक्टिव्ह एजन्सी सुरू केला का, असा खोचक सवाल त्यांनी विचारला. 

राज्य सरकार विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र रचत असल्याचा आरोप फडणवीसांनी गेल्या आठवड्यात केला होता. त्यांच्या आरोपांना वळसे-पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. नवाब मलिक पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आता केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात ते आवाज उठत असतील म्हणून त्यांचं तोंड बंद करायचं हे योग्य नाही, असं वळसे-पाटील म्हणाले.

मलिक यांना अडचणीत आणण्यासाठी जुनं प्रकरण उकरून काढण्यात आलं. मलिक यांच्यावर आरोप करण्यात आले ते प्रकरण अतिशय जुनं आहे. फडणवीस ५ वर्षे मुख्यमंत्री होते. त्या सरकारमध्ये गृहमंत्रिपदही त्यांच्याकडेच होतं. त्यावेळी फडणवीसांनी मलिक यांच्या जमीन खरेदीची चौकशी केली असती, तर बरं झालं असतं, असा खोचक टोला गृहमंत्र्यांनी लगावला.

यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. मग देशभरात सध्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरूय त्याला काय म्हणायचं, असा प्रश्न वळसे पाटील यांनी केला. गिरीश महाजन यांच्याविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप फडणवीसांनी केला. घटना पुण्यात घडली असताना तपास दुसरीकडे वर्ग केल्याचं फडणवीसांनी सांगितलं. अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचा मृत्यू मुंबईत झाला. पण एफआयएर बिहारमध्ये नोंदवला गेला. मग ते प्रकरण सीबीआयनं आपल्या हाती घेतलं, याकडे गृहमंत्र्यांनी लक्ष वेधलं.
 

Web Title: Maharashtra Budget Session home minister dilip walse patil questions devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.