राज्यातील ८६ लाख शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 'बोनस' मिळणार; नमो शेतकरी महासन्मानचा पहिला हप्ता खात्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 03:44 PM2023-10-10T15:44:14+5:302023-10-10T15:44:54+5:30

Maharashtra Cabinate Meeting: केंद्र सरकार गेली काही वर्षे शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत सहा हजार रुपये देत आहे. त्याच धर्तीवर राज्य सरकार देखील शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षाला सहा हजार रुपये टाकणार आहे.

Maharashtra Cabinate Meeting: 86 lakh farmers in the state will get 2000rs 'bonus' before Diwali; The first installment of Namo Shetkari Mahasanman will come into the account | राज्यातील ८६ लाख शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 'बोनस' मिळणार; नमो शेतकरी महासन्मानचा पहिला हप्ता खात्यात येणार

राज्यातील ८६ लाख शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 'बोनस' मिळणार; नमो शेतकरी महासन्मानचा पहिला हप्ता खात्यात येणार

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्या सरकारनेही शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान निधी देण्याची घोषणा केली होती. याला आज मंजुरी देण्यात आली. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच २००० रुपये जमा केले जाणार आहेत. 

मंत्रिमंडळ निर्णय: माजी खंडकरी शेतकऱ्यांना 1 एकरपेक्षा कमी जमीन; विद्यापीठाच्या नावात छत्रपती संभाजीनगर

राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणली होती. परंतू, शेतकऱ्यांना पैसे काही दिले नव्हते. आज पहिल्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा करण्यासाठी १७२० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. 

केंद्र सरकार गेली काही वर्षे शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत सहा हजार रुपये देत आहे. त्याच धर्तीवर राज्य सरकार देखील शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षाला सहा हजार रुपये टाकणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ संकल्प मांडताना याची घोषणा केली होती. अशा प्रकारे केंद्र आणि राज्य सरकारचे असे मिळून १२ हजार रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 

योजनेच्या कार्यान्वनासाठी महाआयटीने सॉफ्टवेअर तयार केलेले आहे. राज्यातील ८६ लाख ६० हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. 'पीएम-किसान'चे निकष आणि संगणकीय माहिती 'नमो किसान'साठी वापरा, अशा सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. 
 

Web Title: Maharashtra Cabinate Meeting: 86 lakh farmers in the state will get 2000rs 'bonus' before Diwali; The first installment of Namo Shetkari Mahasanman will come into the account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.