उत्तर महाराष्ट्राचा 'पंच', मराठवाड्याचा 'चौकार'; जाणून घ्या, शिंदे-फडणवीस सरकारचा विभागनिहाय विस्तार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 12:20 PM2022-08-09T12:20:05+5:302022-08-09T12:28:23+5:30
पाहा कोणा-कोणाला मिळाली नव्या मंत्रिमंडळात संधी.
राज्य मंत्रिमंडळाचा गेल्या महिन्याभरापेक्षा अधिक दिवसांपासून रखडलेला विस्तार मंगळवारी सकाळी पार पडला. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. सध्याच्या मंत्रिमंडळात कोणत्याही महिला आमदाराला संधी देण्यात आली नाही. विस्तारात त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्य ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, नव्या मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अधिक आमदारांना संधी देण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्र
१. राधाकृष्ण विखे पाटील - शिर्डी
२. गिरीश महाजन - जामनेर, जळगाव
३. गुलाबराव पाटील - जळगाव ग्रामीण
४. दादा भुसे - मालेगाव बाह्य
५. विजयकुमार गावित - नंदुरबार
मराठवाडा
१. संदीपान भुमरे - पैठण
२. तानाजी सावंत - परांडा, उस्मानाबाद
३. अब्दुल सत्तार - सिल्लोड, औरंगाबाद
४. अतुल सावे - औरंगाबाद पूर्व
पश्चिम महाराष्ट्र
१. चंद्रकांत पाटील - कोथरुड, पुणे
२. सुरेश खाडे - मिरज
३. शंभुराज देसाई - पाटण, सातारा
विदर्भ
१. सुधीर मुनगंटीवार - बल्लारपूर
२. संजय राठोड - दिग्रस, यवतमाळ
कोकण
१. उदय सामंत - रत्नागिरी
२. दीपक केसरकर - सावंतवाडी
मुंबई, ठाणे
१. रवींद्र चव्हाण - डोंबिवली
२. मंगलप्रभात लोढा - मलबार हिल, मुंबई
अजित पवारांकडून टीकेचा बाण
उशिरा का होईना महाराष्ट्राला मंत्रिमंडळ मिळालं. आता राज्याचे प्रश्न सोडवावे. ज्यांच्याबद्दल काही बोललं जातं, क्लिनचीट मिळाली नाही. त्यांनाही मंत्रिमंडळात घेतलं जातं ते टाळलं असतं तर बरं झालं असतं, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.