मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 03:05 PM2024-10-04T15:05:44+5:302024-10-04T15:17:06+5:30

Cabinet Meeting Decision : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.४) राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत ४१ विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. 

Maharashtra Cabinet Meeting Decision : Fishermen Welfare Corporation Announcement, 41 Important Decisions of State Government Cabinet Meeting, Read... | मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...

मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...

Maharashtra Cabinet Meeting : मुंबई : आगामी विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे विरोधक राज्यातील विविध विषयांवरून सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत, तर दुसरीकडे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निर्णयाचा धडाका लावला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.४) राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत मच्छिमार कल्याणकारी महामंडळाची घोषणा करण्यात आली असून या महामंडळासाठी ५० कोटी मंजूर करण्यात आले. तसेच, प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षाचा तुरुंगवास आणि एक लाख दंडाची तरतूद करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने ३८ निर्णय घेतले होते. यामध्ये सरकारने देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्त्वावरील घरांच्या योजनेस सरकारने मंजुरी दिली होती.

राज्य सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय :
- राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ
- महसूल न्यायाधीकरणाच्या अध्यक्ष व सदस्यांसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवणार
- दौंड येथे बहुउद्देशीय सभागृह नाट्यगृहासाठी शासकीय जमीन
- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामास गती देणार
- टेंभू उपसा सिंचन योजनेस स्व अनिल भाऊ बाबर यांचे नाव
- पूर्णा नदीवर दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामांना गती देणार; सिल्लोड मधील जमिनीला सिंचन
- प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षाचा तुरुंगवास, एक लाख दंडाची तरतूद
- राज्यातील खेळाडूंसाठीच्या पारितोषिकांचा रकमेत वाढ
- राज्यातील आणखी १०४ आयटीआय संस्थांचे नामकरण
- संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवणार
- लहान जलविद्युत प्रकल्पासाठी बांधा वापरा हस्तांतरण धोरण
- कोकण पुणे विभागासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन कंपन्या
- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना
- राज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र 
- जैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ
- महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ
- आजरा तालुक्यातील वेळवट्टी, गवसे, घाटकरवाडी बंदिस्त पाईपलाईन टाकणार
- बंजारा, लमाण तांड्यात ग्रामपंचायतसाठी लोकसंख्येची अट शिथिल
- कागल येथील सागावमध्ये नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय
- महाराष्ट्र सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार
- कुडाळ तालुक्यातील डोंगरेवाडीत साठवण तलाव
- बारी, तेली, हिंदू खाटीक, लोणारी समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे
- गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवणार; २६०४ कोटीस मान्यता
- राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करणार. १ लाख ६० हजार कोटींचे गुंतवणूक अपेक्षित
- उच्च तंत्रज्ञानावर आधारित अतिविशाल प्रकल्प योजनेत सुधारणा; अधिकाधिक प्रकल्पांना प्रोत्साहन
- राळेगण सिद्धी येथील उपसा सिंचन योजनेचे सक्षमीकरण
- शिरोळ तालुक्यातील गावांमध्ये भूमिगत चर योजना राबवणार
- बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान योजना
- सोलापूर ते मुंबई हवाई मार्गासाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग देणार
- वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसायरोध भत्ता देणार
- डेक्कन कॉलेज, गोखले संस्था, टिळक महाराष्ट्र मधील कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना
- वडाळा सॉल्ट पॅनमधील भूखंड शैक्षणिक कारणांसाठी 
- रमाई आवास, शबरी आवास योजनेतील घरकूल अनुदानात वाढ 

Web Title: Maharashtra Cabinet Meeting Decision : Fishermen Welfare Corporation Announcement, 41 Important Decisions of State Government Cabinet Meeting, Read...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.