ड्रग्सविरोधी टास्क फोर्ससह सहाव्या वित्त आयोग स्थापनेला मंजुरी; मंत्रिमंडळाचे ६ निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 14:12 IST2025-02-18T14:10:50+5:302025-02-18T14:12:46+5:30
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकरिता (ANTF) ३४६ नवीन पद निर्मिती व त्यासाठीच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

ड्रग्सविरोधी टास्क फोर्ससह सहाव्या वित्त आयोग स्थापनेला मंजुरी; मंत्रिमंडळाचे ६ निर्णय
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मंत्रालयात झालेल्या बैठकीत राज्य सरकारने ६ महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यात प्रामुख्याने राज्यातील अंमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी सरकारने नवीन टास्क फोर्स निर्मितीला मंजुरी दिली आहे. त्यासाठी ३४६ नवीन पदे निर्मिती आणि त्याच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले?
- म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १ हजार ५९४ कोटींची मान्यता. या योजनेतून अवर्षण प्रवण भागात १ लाख ८ हजार १९७ हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा. (जलसंपदा विभाग)
- अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकरिता (ANTF) ३४६ नवीन पद निर्मिती व त्यासाठीच्या खर्चास मान्यता.(गृह विभाग)
- सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता. (वित्त विभाग)
- राज्यातील रोपवेच्या कामांसाठी राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. (NHLML) ला आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग)
- जळगांव जिल्ह्यामधील चाळीसगांव तालुक्यातील वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्पाच्या १ हजार २७५ कोटी ७८ लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता. चाळीसगाव, भडगाव तालुक्यातील ८ हजार २९० हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा. (जलसंपदा विभाग)
- पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन देण्यास मंजूरी. (महसूल विभाग)