Chiplun Flood : सीएम वगैरे गेले उडत; नारायण राणेंनी व्यक्त केला जिल्हाधिकाऱ्यांवर संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 08:00 AM2021-07-26T08:00:28+5:302021-07-26T08:02:32+5:30

Maharashtra Chiplun Flood : व्यापाऱ्यांनी वाचला नारायण राणेंसमोर तक्रारींचा पाढा. दौऱ्यादरम्यान अधिकारी उपस्थित नसल्यानं नारायण राणेंनी व्यक्त केला संताप. 

maharashtra chiplun flood bjp minister narayan rane scolded ratnagiri collector commented cm uddhav thackeray | Chiplun Flood : सीएम वगैरे गेले उडत; नारायण राणेंनी व्यक्त केला जिल्हाधिकाऱ्यांवर संताप

Chiplun Flood : सीएम वगैरे गेले उडत; नारायण राणेंनी व्यक्त केला जिल्हाधिकाऱ्यांवर संताप

googlenewsNext
ठळक मुद्देव्यापाऱ्यांनी वाचला नारायण राणेंसमोर तक्रारींचा पाढा.दौऱ्यादरम्यान अधिकारी उपस्थित नसल्यानं नारायण राणेंनी व्यक्त केला संताप. 

राज्यातील पूर परिस्थितीमुळे अनेक भागांत मोठं नुकसान झालं आहे. चिपळूण दौऱ्यादरम्यान अधिकारी उपस्थित नसल्यानं भाजप नेत्यांनी मोठा संताप व्यक्त केला. व्यापाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमोर तक्रारींचा पाढ वाचला. त्यानंतर नारायण राणे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून फैलावर घेतलं. परंतु यावेळी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करताना त्यांचा तोल गेल्याचं दिसलं. सीएम बीएम गेला उडत, असं वक्तव्य राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर संवाद साधताना केलं. 

"सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगोत पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथे कोण आहे? इथे तुमचा एक तरी अधिकारी उपस्थित आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं. आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा," असं म्हणत नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. "मला कोणीही सीईओ भेटले नाहीत. मी इथेच बाजारपेठेत उभा आहे. कोण सीईओ आहेत आणि कुठे आहेत हे मला दाखवा," असंही राणे म्हणाले. 

भाजप नेत्यांकडून पाहणी
केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी चिपळूण येथे जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यानंतर राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "मुख्यमंत्री आले त्यांनी पाहणीही केली. ते त्यांच्या पद्धतीने आढावा घेतीलच. मात्र, आपणही पंतप्रधानांना रिपोर्ट देणार आहोत. येथील नागरिकांना कशा प्रकारे दिलासा देता येईल आणि पुन्हा आपल्या पायावर उभे करता येईल यावर विचार करू. हे सर्व लोक आमचे आहेत यांच्या डोळ्यात पाणी येणार नाही, याची काळजी घेऊ," असं राणे पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले होते. 

मुख्यमंत्र्यांवर टीका
"राज्यावर सातत्याने येणाऱ्या संकटांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पायगूणच कारणीभूत आहे,. ते मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात वादळं काय, पाऊस काय, कारोना काय, सर्व सुरूच आहे. एवढेच नाही, तर कोरोना ही त्यांची देन आहे आपल्याला. मुख्यमंत्री आले कोरोना घेऊन आले. पाय पाहायला पाहिजे, पांढरे पाय आहेत का?," अशा शब्दात नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला. 

Web Title: maharashtra chiplun flood bjp minister narayan rane scolded ratnagiri collector commented cm uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.