महाराष्ट्र बंद यशस्वी; कार्यकर्त्यांकडून कोणताही हिंसाचार नाही- प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 16:33 IST2020-01-24T16:32:48+5:302020-01-24T16:33:07+5:30
Maharashtra Bandh : ९ फेब्रुवारीचा मनसेचा प्रस्तावित मोर्चा हा केवळ प्रसिद्धीसाठी आहे.

महाराष्ट्र बंद यशस्वी; कार्यकर्त्यांकडून कोणताही हिंसाचार नाही- प्रकाश आंबेडकर
मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायदा आणि ढासळत्या आर्थिक व्यवस्थेविरोधात वंचित बहुजन आघाडीने आज पुकारलेला बंद मागे घेतला. महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्याचा दावा वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.
आम्ही जोर जबरदस्तीन जनजीवन बंद पाडलंल नाही. शांततापूर्ण बंद पुकारण्यात आला होता. या बंदमुळ कार्यालयातील उपस्थिती तुरळक होती तसंच व्यापारी दुकानंही बंद होती, असा दावा आंबेडकर यांनी केला.
भारतात पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोर असल्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आरोप निराधार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. ९ फेब्रुवारीचा मनसेचा प्रस्तावित मोर्चा हा केवळ प्रसिद्धीसाठी आहे. राजकीय फायद्यासाठी अशाप्रकारे आरोपांचे ढोल वाजवू नयेत. राज यांनी घुसखोरांचे आकडे आणि पुरावे सादर करावेत, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली.