CM Eknath Shinde, Maharashtra Farmers: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही मिळणार प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 03:33 PM2022-07-12T15:33:57+5:302022-07-12T15:34:29+5:30

शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; योजनेतील जाचक अटीदेखील काढण्यात येणार

Maharashtra CM Eknath Shinde declared that Farmers affected by heavy rains or flood will also get the benefit of incentive subsidy scheme | CM Eknath Shinde, Maharashtra Farmers: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही मिळणार प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ

CM Eknath Shinde, Maharashtra Farmers: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही मिळणार प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ

Next

CM Eknath Shinde, Maharashtra Farmers मुंबई: नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही. याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही असे ठरवण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय त्वरीत काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. याबाबत खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी निवेदन देऊन लाखों शेतकरी या अनुदानापासून वंचित राहत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. या निवेदनाच्या अनुषंगाने जाचक अटी  रद्द करून राज्यातील प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

आमदार प्रकाश आबिटकर आणि खासदार धैर्यशील माने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महात्मा फुले कर्जमाफी योजनेत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासाठी शासनाने लावलेले नियम जाचक आहेत. २०१८-१९ मध्ये अतिवृष्टीग्रस्त ज्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई दिली आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात आले  आहे. त्यामुळे राज्यातील लाखों शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. याशिवाय या योजनेत २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या कालावधीत बँक किंवा संस्थांकडून घेतलेले कर्ज पात्र आहे. या निकाशत राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा बँका यांचे आर्थिक वर्ष  वेगेवेगळे असल्याने शेतकऱ्यांना त्याचा  लाभ होणार नाही असे म्हटले आहे.

Web Title: Maharashtra CM Eknath Shinde declared that Farmers affected by heavy rains or flood will also get the benefit of incentive subsidy scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.