खराब हवामानमुळं मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर भरकटलं, पुन्हा मुंबईत लँडिग; आता शिंदेंचा रस्ते मार्गाने प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 05:20 PM2023-08-10T17:20:46+5:302023-08-10T17:21:19+5:30

आता एकनाथ शिंदे रस्ते मार्गाने आपल्या गावी जाणार असल्याचे समजते.

Maharashtra CM Eknath Shinde's Helicopter Develops Technical Snag, Makes Emergency Landing In Mumbai | खराब हवामानमुळं मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर भरकटलं, पुन्हा मुंबईत लँडिग; आता शिंदेंचा रस्ते मार्गाने प्रवास

खराब हवामानमुळं मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर भरकटलं, पुन्हा मुंबईत लँडिग; आता शिंदेंचा रस्ते मार्गाने प्रवास

googlenewsNext

मुंबई : खराब हवामानमुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं हेलिकॉप्टर (Helicopter) भरकटल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या दरे या गावी जात होते. मात्र, पाऊस आणि धुक्यामुळे त्यांचे हेलिकॉप्टर दरे या गावी उतरवणे शक्य झाले नाही. त्यामुळे हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईत राजभवन येथे लँडिंग करण्यात आले. आता एकनाथ शिंदे रस्ते मार्गाने आपल्या गावी जाणार असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील दरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मूळ गाव आहे. एकनाथ शिंदे तीन दिवस आपल्या गावी जाणार आहेत. या दौऱ्यात एकनाथ शिंदे हे दरे गावात मुक्काम करणार असून या भागातील काही शेतकऱ्यांना भेटून बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देणार आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतात ते स्वता बांबू लागवड करतील. दरम्यान, आता एकनाथ शिंदे यांच्या या हवाई दौऱ्यात अडथळा आल्यामुळे ते रस्ते मार्गाने प्रवास करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या आधीही अशाच प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर जळगाव विमानतळावर लँडिंग करण्यात आले होते. धुळ्यात आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरद्वारे जात होते. दरम्यान, धुळ्याकडे रवाना झाल्यानंतर अचानक पावसाचे सावट आल्याने हेलिकॉप्टरचा मार्ग बदलण्यात आला आणि त्यांचे हेलिकॉप्टर जळगावला उतरविण्यात आले होते. 

Web Title: Maharashtra CM Eknath Shinde's Helicopter Develops Technical Snag, Makes Emergency Landing In Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.