Uddhav Thackeray : बळीराजाचे सर्जा-राजावरील प्रेमच जिंकले, बैलगाडा शर्यतीच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 06:48 PM2021-12-16T18:48:28+5:302021-12-16T18:48:58+5:30

Uddhav Thackeray : आपली संस्कृती आणि परंपरा टीकवून ठेवणाऱ्या या शर्यंतीसाठी अखेरपर्यंत चिवटपणे लढा देणाऱ्या पशूप्रेमींचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.

Maharashtra CM Uddhav Thackeray welcomes SC decision to allow resumption of bullock cart races, says 'livestock should not be harassed' | Uddhav Thackeray : बळीराजाचे सर्जा-राजावरील प्रेमच जिंकले, बैलगाडा शर्यतीच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

Uddhav Thackeray : बळीराजाचे सर्जा-राजावरील प्रेमच जिंकले, बैलगाडा शर्यतीच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

Next

मुंबई :  सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला (Bullock cart racing) काही अटी आणि नियम घालून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा धुरळा उडणार आहे. दरम्यान, आपल्या पशूधनाचा जीवापाड सांभाळ करणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणजेच बळीराजाचे आपल्या सर्जा-राजावरील प्रेमच जिंकले, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैलगाडी शर्यतीवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. आपली संस्कृती आणि परंपरा टीकवून ठेवणाऱ्या या शर्यंतीसाठी अखेरपर्यंत चिवटपणे लढा देणाऱ्या पशूप्रेमींचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.

बैलगाडी शर्यत ही पशूपालक आणि पशूधनावर जीवापाड प्रेम करणाऱ्या बळीराजाची पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. आपल्या संस्कृतीत पशूधनालाही दैवताचे स्थान आहे. यातून पशूधनाचे जतन, संवर्धनाचाही विचार केला गेला आहे. शर्यंतीमधून या सगळ्या बाबींना प्रोत्साहन मिळत असे. शर्यंती सुरू व्हाव्यात यासाठी दीर्घ असा आणि चिवटपणे लढा द्यावा लागला. त्यामागेही बळीराजाचे आपल्या पशूधनावरील प्रेमाचे बळच होते. शर्यती, असोत किंवा नसोत, आपले पशूपालक या पशूधनाची पोटच्या लेकरांप्रमाणे काळजी घेतात, हे सर्वांनाच माहीत होते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

याचबरोबर, आता शर्यती सुरु होतील, त्यामधून आपल्या लोकपरंपरेचे आणि पशूधनाचे वैभवही सगळ्यांना पाहता येईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात, पण त्यामध्ये गैर प्रकार आणि पशूधनाचा कदापीही छळ होऊ नये. त्याबाबत घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले जावे, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.  

गेल्या काही वर्षांपूर्वी मुंबई हायकोर्टाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, आता सुप्रीम कोर्टाने राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. बैलगाडा शर्यती आयोजित करताना नियमांचे पालन करावे लागेल. नियमांच्या चौकटीत राहून शर्यतीचे आयोजन करावे लागेल. तसेच, पशू क्रूरता प्रतिबंधक कायद्यातंर्गत नियमांचं पालन करणे बंधनकारक असणार आहे. दरम्यान, बैलागाडा शर्यतींचे राज्यातील ग्रामीण भागात मोठे आकर्षण आहे. यासाठी ग्रामीण भागात अनेक आंदोलनेसुद्धा झाली. गावच्या यात्रांमध्ये बैलगाडा शर्यती भरवल्या जातात. मात्र बंदीमुळे यावर बंधने आली होती.

हा शेतकऱ्यांच्या लढाईचा विजय - नाना पटोले
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. शेतकऱ्यांच्या लढाईचा हा विजय असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. पशू व दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांनी सतत याचा पाठपुरावा केल्याचा उल्लेख करत पटोलेंनी केदार यांची पाठ थोपाटली आहे. आजचा क्षण शेतकऱ्यांच्या जीवनातील आनंदाचा क्षण  आहे. यावेळी पटोले यांनी राज्यातील शेतकऱ्यांनाही शुभेच्छा दिल्या. 

Web Title: Maharashtra CM Uddhav Thackeray welcomes SC decision to allow resumption of bullock cart races, says 'livestock should not be harassed'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.