महाराष्ट्र गारठला, मुंबईमध्ये माथेरानचा ‘फील’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 06:02 AM2023-01-02T06:02:03+5:302023-01-02T09:01:08+5:30
राज्यभरातील बहुतांश शहरांचे किमान तापमान ११ ते १२ अंशादरम्यान नोंदविण्यात आले.
मुंबई : उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याने वर्षाचा पहिलाच दिवस गारेगार केला आणि मुंबईकरांची पहाट आल्हादायक झाली. रविवारी मुंबईचे किमान तापमान १५.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबई आणि माथेरान या दोन शहरांचे किमान तापमान १५ अंशांवर असल्याने मुंबईकरांना थंडीने माथेरानचा ‘फील’ दिल्याचे चित्र आहे. राज्यभरातील बहुतांश शहरांचे किमान तापमान ११ ते १२ अंशादरम्यान नोंदविण्यात आले. गुलाबी थंडीने वर्षारंभ झाला असतानाच पुढील काही दिवस आल्हाददायी वातावरण कायम राहील, असा अंदाज आहे.
‘या’ शहरांत थंडी
नाशिक- १०
औरंगाबाद - १०.४
जळगाव -११
पुणे - १२.५
गडचिरोली -१३.४
बारामती - १३.८
महाबळेश्वर -१३.९
बुलढाणा - १४.२
गोंदिया - १४.५
वर्धा - १५
वाशिम - १५
माथेरान - १५.२
यवतमाळ - १५.५
अमरावती - १५.५
मुंबई - १५.६
नागपूर - १५.६
अकोला - १५.९
नांदेड - १६.४