Maharashtra Corona Update : राज्यात 919 नव्या कोरोना बाधितांची नोंद, एकाचा मृत्यू; अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 5 हजारच्या जवळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 11:39 PM2023-04-11T23:39:59+5:302023-04-11T23:43:06+5:30
राज्यात सोमवारी कोरोना रुग्ण संख्येत घट दिसून आली होती. सोमवारी राज्यभरात 328 नवे कोरोना बाधित आढळून आले होते आणि एकाचा मृत्यू झाला होता. तसेच, रविवारी राज्यात 788 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. राज्यात मंगळवारी 919 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. तर एकाचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 81,51,176 वर पोहोचला आहे. ही आकडेवारी राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केली आहे. याच बरोबर, आता राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1,48,461 वर पोहोचली आहे.
राज्यात सोमवारी कोरोना रुग्ण संख्येत घट दिसून आली होती. सोमवारी राज्यभरात 328 नवे कोरोना बाधित आढळून आले होते आणि एकाचा मृत्यू झाला होता. तसेच, रविवारी राज्यात 788 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.
राजधानी मुंबईत समोर आले सर्वाधिक रुग्ण -
ताज्या आकडेवारीनुसार, एकट्या मुंबईत 242 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यानंतर नागपुरात 105, पुण्यात 58 आणि नवी मुंबईत 57 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दुसरीकडे, राज्यातील एकमेव मृत्यूची नोंद अकोला शहरात झाली आहे.
महाराष्ट्रातील सक्रीय रुग्णांचा आकडा 4,875 -
राज्यात मंगळवारी 710 रुग्ण बरे झाले असून, यासह राज्यातील एकूण बऱ्या झालेल्या कोरोनाबाधितांची संख्या 79,97,840 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात 4 हजार 875 एवढे सक्रीय रुग्ण आहेत. मृत्यू दरासंदर्भात बोलायचे झाल्यास, तो राज्यात 1.82 टक्के एवढा आहे. तर रिकव्हरी रेट 98.12 टक्के आहे. हेल्थ बुलेटिननुसार, गेल्या 24 तासांत राज्यात एकूण 12,841 सँपल टेस्ट करण्यात आले आहेत.