Maharashtra Corona Update : राज्यात प्रथमच आढळले BA व्हेरियंटचे रुग्ण; पुण्यात BA.4 च्या चार, तर BA.5 च्या तीन रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 06:59 PM2022-05-28T18:59:04+5:302022-05-28T19:01:14+5:30

महाराष्ट्रातील कोरोनाचे जवळपास सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. पण कोरोना रुग्णांची संख्या आता वाढताना दिसत आहे

Maharashtra Corona Update BA variant found for the first time in the state 7 patients registered in Pune | Maharashtra Corona Update : राज्यात प्रथमच आढळले BA व्हेरियंटचे रुग्ण; पुण्यात BA.4 च्या चार, तर BA.5 च्या तीन रुग्णांची नोंद

Maharashtra Corona Update : राज्यात प्रथमच आढळले BA व्हेरियंटचे रुग्ण; पुण्यात BA.4 च्या चार, तर BA.5 च्या तीन रुग्णांची नोंद

Next

मुंबई-

महाराष्ट्रातील कोरोनाचे जवळपास सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. पण कोरोना रुग्णांची संख्या आता वाढताना दिसत आहे. त्यात आज राज्यात प्रथम कोरोनाच्या BA.4 आणि BA.5 व्हेरियंटचे रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्याचं आरोग्य विभाग सतर्क झालं आहे. 

मोठी बातमी! भारतात कोरोनाचा BA.4 आणि BA.5 व्हेरिअंट आढळला; INSACOG ची पुष्टी

पुण्यातील बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाच्या समन्वयाने सुरू असलेल्या जनुकीय क्रमनिर्धारण सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालानुसार पुणे शहरात BA.4 व्हेरियंटचे चार तर BA.5 व्हेरियंटचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. 

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर) केलेल्या जनुकीय तपासणीत हे नवे व्हेरियंट आढळून आले आहेत. इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटरनंही याची पुष्टी केली आहे. 

राज्यात आज आढळलेले बी ए. व्हेरियंटचे सर्व रुग्ण पुणे शहरातील आहे. यामध्ये चार पुरूषांचा आणि तीन महिलांचा समावेश आहे. सर्व रुग्णांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले असून यातील ९ वर्षाच्या लहान मुलाने लस घेतलेली नाही.  सर्व रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून सर्व रुग्णांना घरगुती विलिगीकरणात आहे. 

राज्यात २७७२ सक्रिय रुग्णांची नोंद
राज्यात आज एकूण २७७२ इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे १९२९ रुग्ण हे मुंबईमध्ये आढळतात. तर त्या खालोखाल पुण्यामध्ये ३१८ इतके सक्रिय रुग्ण आहेत. 

Web Title: Maharashtra Corona Update BA variant found for the first time in the state 7 patients registered in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.