Maharashtra Corona Updates: लोकप्रतिनिधी कोरोनाच्या विळख्यात! राज्यात आतापर्यंत १३ मंत्री आणि ७० आमदारांना लागण; वडेट्टीवारांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 06:57 PM2022-01-04T18:57:03+5:302022-01-04T18:57:27+5:30
Maharashtra Corona Updates: राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना राजकीय क्षेत्रातील व्यक्ती कोरोना संक्रमित होण्याचं प्रमाण देखील वाढत आहे.
Maharashtra Corona Updates: राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना राजकीय क्षेत्रातील व्यक्ती कोरोना संक्रमित होण्याचं प्रमाण देखील वाढत आहे. लोकप्रतिनिधी कोरोनाच्या विखळ्यात सापडत असून आतापर्यंत राज्याचे १३ मंत्री आणि ७० आमदार कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
जनतेचं प्रतिनिधीत्व करणारे नेते सामाजिक पातळीवर अनेकांच्या भेटीगाठी घेत असतात. अनेकांच्या संपर्कात येत असतात. लोकप्रतिनिधीच एकापाठोपाठ एक कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.
राज्यात बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, एकनाथ शिंदे, धीरज देशमुख, रोहित पवार, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील, केसी पाडवी, प्रताप सरनाईक, माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक आमदार आणि मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.