Maharashtra Corona Updates: कोरोनाच्या चौथ्या लाटेची चाहुल? राज्यात मोठी रुग्णवाढ, मुंबईचा आकडा देतोय इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 07:28 PM2022-06-04T19:28:02+5:302022-06-04T19:28:38+5:30

Maharashtra Corona Updates: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १,३५७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.

Maharashtra Corona Updates 1357 new corona cases in last 24 hours | Maharashtra Corona Updates: कोरोनाच्या चौथ्या लाटेची चाहुल? राज्यात मोठी रुग्णवाढ, मुंबईचा आकडा देतोय इशारा!

Maharashtra Corona Updates: कोरोनाच्या चौथ्या लाटेची चाहुल? राज्यात मोठी रुग्णवाढ, मुंबईचा आकडा देतोय इशारा!

googlenewsNext

Maharashtra Corona Updates: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १,३५७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर ५९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्णांची वाढती आकडेवारी आता प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं राज्यातील जनतेला सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. राज्यातील वाढती रुग्णसंख्येत सर्वात मोठा वाटा मुंबईतील रुग्णसंख्येचा आहे. मुंबईत आज दिवसभरात ८८९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

सक्ती नाही, पण मास्क वापरा; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन

राज्यात शुक्रवारी १,०३४ रुग्णांची नोंद झाली होती. तर ५६३ रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. त्यानंतर आज हा आकडा थेट १,३५७ वर पोहोचला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ८.०६ टक्के इतकं झालं असून मृत्यूदर १.८७ टक्के इतका आहे. 

राज्यात सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याच्या आवाहनाचं पत्रक जारी, 'या' ठिकाणांचा समावेश

मास्क वापरण्याचं राजेश टोपे यांचं आवाहन
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मास्क सक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं. "आपल्याकडे मुबई, पुणे, पालघर, रायगड, ठाणे या जिल्ह्यांमध्ये थोड्याप्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय. या पार्श्वभूमीवर केंद्राच्या आरोग्य विभागाकडून पत्रक आलं आहे. या जिल्ह्यातील लोकांसाठी उपाययोजना कराव्या लागतील आणि कोरोनाबाधितांची संख्या वाढू नये म्हणून उपाययोजना कराव्या लागतील. त्याबाबती टास्क फोर्सची एक बैठक झाली. यात बंदीस्त ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन करावं, असं ठरवण्यात आलं. तो आवाहनाचा मुद्दा आहे, त्यात मास्कसक्ती नाही," असं स्पष्टीकरण टोपे यांनी दिलं. इंग्रजीत मस्ट हा शब्द वापरल्यानं तो सक्तीचा असा होत नाही, मॅंडेटरी असा होत  नसल्याचंही ते म्हणाले.

Web Title: Maharashtra Corona Updates 1357 new corona cases in last 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.