Maharashtra Corona Updates: राज्यातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट; धुळवडी दिवशी दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 08:52 PM2021-03-29T20:52:22+5:302021-03-29T20:53:01+5:30

Maharashtra Corona Updates: राज्यात धुळवडी दिवशी कोरोना रुग्ण संख्येबाबत दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३१ हजार ६४३ नवे रुग्ण वाढले आहेत.

Maharashtra Corona Updates state reports 31643 new COVID19 cases 20854 recoveries and 102 deaths in the last 24 hours | Maharashtra Corona Updates: राज्यातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट; धुळवडी दिवशी दिलासा

Maharashtra Corona Updates: राज्यातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट; धुळवडी दिवशी दिलासा

googlenewsNext

Maharashtra Corona Updates: राज्यात धुळवडी दिवशी कोरोना रुग्ण संख्येबाबत दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३१ हजार ६४३ नवे रुग्ण वाढले आहेत. दिलासादायक बाब अशी की, रविवारी ४० हजाराहून अधिक रुग्ण आढळले होते. तर शनिवारी राज्यात ३५ हजार ७२६ नवे रुग्ण वाढले होते. अर्थात आजची आकडेवारी देखील चिंतादायक असली तरी कालच्या आकडेवारीपेक्षा जवळपास ९ हजारांनी आज कमी रुग्ण आढळले आहेत. 

राज्यात आज ३१ हजार ६४३ नवे रुग्ण आढळले आहेत. तर २० हजार ८५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत १०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंतच्या कोरोना रुग्णांचा आकडा २७ लाख ४५ हजार ५१८ इतका झाला आहे. तर २३ लाख ५३ हजार ३०७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत ५४ हजार २८३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्याच्या घडीला ३ लाख ३६ हजार ५८४ सक्रिय रुग्ण आहेत. 
 

Web Title: Maharashtra Corona Updates state reports 31643 new COVID19 cases 20854 recoveries and 102 deaths in the last 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.