CoronaVirus News: भयावह! राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; मृतांच्या आकड्यानं चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 09:14 PM2021-03-31T21:14:41+5:302021-03-31T22:01:53+5:30
CoronaVirus News: राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; प्रशासनाची चिंता वाढली
Maharashtra Corona Updates: गेल्या दोन दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. दोन दिवसांत कोरोना रुग्णांचा आकडा १२ हजारांनी खाली आला होता. मात्र आता एकाच दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत १२ हजारांची वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३९ हजार ५४४ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर २२७ जणांचा मृत्यू झाला. चालू वर्षात प्रथमच एका दिवसात इतक्या जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मोठा दिलासा! आता ५०० रुपयांत होणार कोरोनाची 'RTPCR' चाचणी; राजेश टोपेंची घोषणा
राज्यात गेल्या २४ तासांत २३ हजार ६०० जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनावर मात करणाऱ्यांचा एकूण आकडा २४ लाखांच्या पुढे गेला. राज्यात आतापर्यंत २८ लाख १२ हजार ९८० जणांना कोरोनाची लागण झाली असून यातील ५४ हजार ६४९ जण दगावले आहेत. तर सध्याच्या घडीला ३ लाख ५६ हजार २४३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Maharashtra reports 39,544 new #COVID19 cases, 23,600 discharges and 227 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) March 31, 2021
Total cases 28,12,980
Total recoveries 24,00,727
Death toll 54,649
Active cases 3,56,243 pic.twitter.com/mCgf0QK8xT
गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ सुरू होती. मात्र काल आणि परवा कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट झाली आहे. काल राज्यात २७ हजार ९१८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर २३ हजार ८२० जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला. रविवारी राज्यात ४० हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले होते. मात्र दोनच दिवसांत हा आकडा १२ हजारांनी खाली आला आहे. आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.