Maharashtra Corona Vaccination: राज्याची विक्रमी कामगिरी, दिवसभरात १२ लाख लसवंत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 12:05 AM2021-09-05T00:05:59+5:302021-09-05T00:08:39+5:30
राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी दिली माहिती.
कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. दरम्यान, कोरोना प्रतिबंधात्मक कार्यक्रमात महाराष्ट्रानं विक्रमी कामगिरी केली आहे. बुधवारी रात्री ८ वाजेपर्यंत महराष्ट्रात तब्बल १२ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना लसीचे डोस देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रात बुधवारी रात्री ८ वाजेपर्यंत एका दिवसात तब्बल १२,०६,३२७ नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी दिली. यापूर्वी महाराष्ट्रानं २१ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी ११ लाख ४ हजार ४६४ जणांना लसीचे डोस देत सर्वाधिक संख्या नोंदवली होती. परंतु शनिवारी एका दिवसात राज्यात १२ लाखांपेक्षा अधिक लसीचे डोस देण्यात आले. सध्या लसींचे दोन्ही डोस देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे.
We crossed the 12-lakh mark today as 12,06,327 doses of COVID vaccines were administered by 8 pm, today in Maharashtra: Dr Pradeep Vyas, ACS Health
— ANI (@ANI) September 4, 2021
Mumbai administered 1.3 lakh vaccines today. The good news is that 80% of eligible citizens of Municipal Corporation of Greater Mumbai have taken at least one dose of vaccine: BMC Commissioner Iqbal Singh Chahal#COVID19pic.twitter.com/KIpxrwNMhH
— ANI (@ANI) September 4, 2021
मुंबईतही विक्रमी लसीकरण
मुंबईतही शनिवारी विक्रमी लसीकरण झालं. दिवसभरात मुंबईत १.३ लाख नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले. "मुंबईत शनिवारी दिवसभरात १.३ लाख नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ८० टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांनी किमान लसीचा पहिला डोस घेतला आहे ही आनंदाची बातमी आहे," अशी प्रतिक्रिया मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिली.