CoronaVirus updates: मुंबईत कोरोनाचा हाहाकार, 24 तासांत 57 जणांचा मृत्यू; 'या' 6 राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी नियम कडक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 08:29 PM2021-04-19T20:29:50+5:302021-04-19T20:32:46+5:30
महाराष्ट्रात तर कोरोना रोजच्या रोजच नवा विक्रम करत आहे. अशीच स्थिती मुंबईचीही आहे. येथेही रोजच्या रोज सक्रीय रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. (CoronaVirus updates)
नवी दिल्ली - कोरोना व्हारसर (CoronaVirus ) पसरण्याचा वेग दिवसागणिक वाढतच चालला आहे. महाराष्ट्रात तर कोरोना रोजच्या रोजच नवा विक्रम करत आहे. अशीच स्थिती मुंबईचीही आहे. येथेही रोजच्या रोज सक्रीय रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. आज मुंबईत 7381 नवे रुग्ण नोंदवले गेले. तर गेल्या 24 तासांत कोरोनामुळे तब्बल 57 जणांचा मृत्यू झाला. (Maharashtra CoronaVirus updates 57 killed in 24 hours in Mumbai)
मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला सध्या नागपूरला कोरोना रुग्णालयांसाठी रेमडेसिवीरच्या 10000 कुप्या देण्यात याव्यात. तसेच, सर्व खासगी रुग्णालयांनाही आपले ऑक्सीजन जनरेशन युनिट लावण्याची परवानी देण्यात यावी, असे आदेश दिले आहेत.
Breaking News : १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचंच लसीकरण; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
'या' 6 राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी नियम कडक -
केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंड राज्य कोरोनाचा विचार करता संवेदनशील आहेत, असे महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे. ट्रेनने येणाऱ्या प्रवाशांना 48 तासांच्या आत करण्यात आलेल्या आरटीपीआर तपासणीचा रिपोर्ट बंधनकारक आहे. या संवेदनशील भागांतून येणाऱ्या रेल्वे गाड्यांत महाराष्ट्रासाठी अनारक्षित तिकिटांचे बुकिंग करण्यात येणार नाही. प्रवाशाजवळ आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट नसल्यास त्याची रॅपिड अँटीजन टेस्ट केले जाईल.
...तर हातावर मारण्यात येणार 15 दिवसांचा क्वारंटाइन स्टम्प -
तपासात पॉझिटिव्ह अथवा कोरोनाची लक्षणे असणाऱ्या लोकांना क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठविण्यात येणार आहे. तसेच ज्यांना लक्षणे नाहीत, अशांच्या हातावर 15 दिवसांच्या क्वारंटाइनचा स्टम्प मारण्यात येईल. याशिवाय, ज्यांनी आपल्यासोबत आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट आणला आहे अथवा स्टेशनवर तपासादरम्यान अँटीजन टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे, अशांच्याही हातावर 15 दिवसांच्या क्वारंटाइनचा स्टम्प मारण्यात येणार आहे. लक्षण आणि पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना इंस्टिट्यूशनल क्वारंटानिमध्ये पाठविण्यात येईल.
मुंबईत रविवारी समोर आलेले रुग्ण -
• 24 तासांतील एकूण रुग्ण - 8479
• 24 तासांतील मृत्यू - 53
• मुंबईतील एकूण रुग्ण संख्या - 5,79,486
• मुंबईतील सक्रिय रुग्ण संख्या - 86,688
• मुंबईत आतापर्यंत झालेले मृत्यू - 12,354
• 24 तासांतील महाराष्ट्रातील नवे रुग्ण - 68631
• महाराष्ट्रातील सक्रिय रुग्ण संख्या - 6,70,388