Maharashtra Coronavirus Updates: गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात ४२ हजार ५८२ कोरोना रुग्ण आढळले तर ८५० मृत्यूंची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 08:36 PM2021-05-13T20:36:49+5:302021-05-13T20:37:29+5:30
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ०३ लाख ५१ हजार ३५६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५२ लाख ६९ हजार २९२ (१७.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबई – राज्यात गेल्या २४ तासांत ५४ हजार ५३५ रुग्ण बरे होऊन घरी परतल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळालं आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ४६ लाख ५४ हजार ७३१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८८.३४% एवढे झाले आहे. तर गुरुवारी दिवसभरात ४२ हजार ५८२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर ८५० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ०३ लाख ५१ हजार ३५६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५२ लाख ६९ हजार २९२ (१७.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५ लाख ०२ हजार ६३० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८ हजार ८४७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात गुरुवारी एकूण ५ लाख ३३ हजार २९४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या खालील प्रमाणे
मुंबई - ३६३३८
ठाणे - ३०९२२
पालघर - १४७५४
रत्नागिरी - १०६१९
पुणे - १०११८१
सातारा - २३६४७
सांगली -१९९७१
कोल्हापूर - १९९१२
सोलापूर- २१२३३
नाशिक- १६६१७
अहमदनगर - २८८६२
जळगाव - १०९११
बीड - १८४९९
अमरावती - १०९३७
नागपूर - ४५९९६
चंद्रपूर - १६३६७
आज राज्यात ४२ हजार ५८२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५२ लाख ६९ हजार २९२ झाली आहे.
सक्रीय रुग्णांची विभागवार आकडेवारी
मुंबई महानगरपालिका - १९५२
ठाणे - ४७३
ठाणे मनपा - ३४२
नवी मुंबई मनपा - २०७
कल्याण डोंबिवली मनपा -६११
ठाणे विभाग - ५९५३
नाशिक विभाग - ६५०६
पुणे विभाग - १२६१९
कोल्हापूर विभाग - ४४६७
औरंगाबाद विभाग - १८७०
लातूर विभाग - २४५९
अकोला विभाग - ४०५६
नागपूर विभाग – ४६५२
आज नोंद झालेल्या एकूण ८५० मृत्यूंपैकी ४०९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १६० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २८१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २८१ मृत्यू, ठाणे- ५६, पुणे- ४०, नागपूर- २९, बीड- २०, गडचिरोली- १९, रत्नागिरी- १६, नंदूरबार- १५, सोलापूर- १५, जळगाव- १४, बुलढाणा- ११, नाशिक- ८, औरंगाबाद- ५, चंद्रपूर- ४, जालना- ४, रायगड- ४, सातारा- ४, सांगली- ३, वाशिम- ३, भंडारा- २, लातूर- २, नांदेड- २, उस्मानाबाद- २, धुळे- १, परभणी- १ आणि सिंधुदुर्ग- १ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.