Maharashtra Covid Update : महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी एक हजारहून अधिक नवे कोरोनाबाधित, सक्रीय रुग्णांची संख्या 5928 वर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 08:58 PM2023-04-14T20:58:23+5:302023-04-14T21:00:31+5:30

महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाचे एक हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात गुरुवारी (13 एप्रिल) कोरोनाचे 1086 नवेन रुग्ण आढळून आले होते. तर एकाचा मृत्यू झाला होता. तसेच बुधवारी (12 एप्रिल) 1,115 नवे रुग्ण आढळून आले होते.

Maharashtra Covid Update: For the third consecutive day, more than a thousand new corona cases in Maharashtra, the number of active patients has reached on 5928 | Maharashtra Covid Update : महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी एक हजारहून अधिक नवे कोरोनाबाधित, सक्रीय रुग्णांची संख्या 5928 वर

Maharashtra Covid Update : महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी एक हजारहून अधिक नवे कोरोनाबाधित, सक्रीय रुग्णांची संख्या 5928 वर

googlenewsNext

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. राज्यात शुक्रवारी (14 एप्रिल) 1152 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. यानंतर आता राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 5928 वर पोहोचली आहे. त्याचवेळी कोरोनामुळे चार जणांचा मृत्यूही झाला आहे. महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाचे एक हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात गुरुवारी (13 एप्रिल) कोरोनाचे 1086 नवेन रुग्ण आढळून आले होते. तर एकाचा मृत्यू झाला होता. तसेच बुधवारी (12 एप्रिल) 1,115 नवे रुग्ण आढळून आले होते.

गेल्या 24 तासांत 920 लोक रिकव्हर -
महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या कोरोना बुलेटिननुसार, गेल्या 24 तासांत 920 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. याच बरोबर, 14 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात 80 लाख 126 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 98.11 टक्के एवढा आहे. या घडीला सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईत कोरोनाचे 1643 सक्रिय रुग्ण आहेत. तर ठाण्यात 1056 सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत गेल्या 10 दिवसांतील कोरोना रुग्ण -
- 4 एप्रिलला शहरात 218 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. कुणाचाही मृत्यू नाही.
- 5 एप्रिलला शहरात कोरोनाचे 221 नवे रुग्ण सामोर आले. तसेच एकाचा मृत्यू झाला. 
- 6 एप्रिलला कोरोनाचे 216 नवे रुग्ण समोर आले आणि एकाचा मृत्यू झाला.
- 7 एप्रिलला 276 नवे रुग्ण समोर आले आणि कुणाचाही मृत्यू नाही.
- 8 एप्रिलला 207 नवे रुग्ण समोर आले आणि कुणाचाही मृत्यू नाही. 
- 9 एप्रिलला मुंबईत 221 नवे रुग्ण समोर आले आणि कुणाचाही मृत्यू नाही.
- 10 एप्रिलला 95 नवे रुग्ण समोर आले आणि कुणाचाही मृत्यू नाही.
- 11 एप्रिलला शहरात कोरोनाचे 242 नवे रुग्ण आढळले आणि कुणाचाही मृत्यू नाही. 
- 12 एप्रिलला मुंबईत 320 नवे कोरोना रुग्ण समोर आले.
- 13 एप्रिलला मुंबईमध्ये 274 नवे कोरोना रुग्ण समोर आले.

Web Title: Maharashtra Covid Update: For the third consecutive day, more than a thousand new corona cases in Maharashtra, the number of active patients has reached on 5928

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.