Maharashtra Day : वर्तमानातही इतिहास घडवू पाहणारे ‘महा’कर्तृत्ववान !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 08:20 AM2018-05-01T08:20:43+5:302018-05-01T08:20:43+5:30

अवघ्या मराठीजनांना अभिमान वाटणाऱ्या आपल्या महाराष्ट्राचा स्थापना दिवस.

Maharashtra Day 2018 : Inspirational Personalities in Maharashtra | Maharashtra Day : वर्तमानातही इतिहास घडवू पाहणारे ‘महा’कर्तृत्ववान !

Maharashtra Day : वर्तमानातही इतिहास घडवू पाहणारे ‘महा’कर्तृत्ववान !

Next

महाराष्ट्र दिन. 

अवघ्या मराठीजनांना अभिमान वाटणाऱ्या आपल्या महाराष्ट्राचा स्थापना दिवस. तेवढंच नव्हे तर महाराष्ट्राच्या स्थापनेचा कलश मिळवणं ज्यांच्या हौतात्म्यामुळे शक्य झाले त्या कष्टकऱ्यांचा कामगार दिनही एक मे याच दिवशी. 

मुंबईच्या हुतात्मा चौकात कष्टकरी शेतकरी आणि कामगारांचं शिल्प आहे. हातात मशाल घेतलेले. महाराष्ट्राची त्यागाची, संघर्षाची आणि स्वाभिमानाची परंपरा अभिव्यक्त करणारं. महाराष्ट्राची परंपरा अभिमान बाळगावा अशीच. छत्रपती शिवाजी महाराजांची पराक्रमाची. सुराज्याची. संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांपासून अवघ्या संतांची प्रबोधनात्मक भक्तीमार्गाची. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, गाडगेबाबा या महापुरुषांची समाजाला पुढे नेत माणसासारखं जगण्याचा हक्क देण्यासाठी लढण्याची. 

उगाच नाही म्हणत मराठी माणूस...भूगोल तर असतो प्रत्येकालाच, मात्र महाराष्ट्राला आहे गौरवशाली इतिहासही. तोही अभिमान बाळगावा असा इतिहास. एकीकडे अभिमान बाळगावा असा इतिहास दुसरीकडे वर्तमानातही नवं काही तरी घडवून इतिहास घडवण्याची आकांक्षा. 

त्यामुळे या महाराष्ट्र दिनी www.lokmat.com टीमने आपल्या महाराष्ट्राला, आपल्या सर्वांनाच अभिमान वाटावा अशा अस्सल महाराष्ट्रीयन कर्तृत्ववान शोधून आपल्या समोर मांडलेत. लार्जर दॅन लाइफ प्रतिमा असलेली भलीमोठी मराठी माणसं खूप आहेत. ज्यांना सातत्यानं प्रसिद्धी मिळते. ज्यांना समाज ओळखतो. दाद देत असतो. साथही देत असतो. मात्र त्यांच्याप्रमाणेच कर्तृत्ववानांचा एक मोठा वर्ग असा आहे जो आपापल्या भागात, आपापल्या क्षेत्रात स्वत:ला झोकून देत समाजासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी धडपडत असतो. अशा अनेकांना त्या-त्या भागांमध्ये स्थानिक ओळखतात. मात्र प्रसिद्धीचा झोत म्हणावा तसा लाभत नसल्याने त्यांच्या कर्तृत्वाची माहिती तेवढ्यापुरतीच मर्यादित राहते, त्यांची ओळख अवघ्या महाराष्ट्राला, जगभरातील मराठी माणसांना करुन देण्याच्या हा एक प्रयत्न आहे.

ज्यांचं जीवन आपल्यापुढे मांडलंय त्यांच्यातील प्रत्येकानं आपल्या क्षेत्रात काहीतरी वेगळं करुन दाखवलं आहे. कुणी वैद्यकीय क्षेत्रात आहे. कुणी सामाजिक क्षेत्रात आहे. कुणी कला क्षेत्रात. तर कुणी उद्योग क्षेत्रात आपल्या गुणवत्तेला कष्टाची जोड देत वेगळा ठसा उमटवला आहे. 

महाराष्ट्रातील महाराष्ट्र दिनी गुणवंत, कर्तृत्ववानांच्या समर्पणाला मानाचा मुजरा करत असतानाच त्यांचं कर्तृत्व आपल्यासमोर मांडण्याचा हा एक प्रयत्न आहे.

भविष्यातही अशाच कर्तृत्ववानांची जीवनगाथा आपल्यासमोर मांडत राहू. आपणही अशांची माहिती हक्कानं कळवा. 

आज दिवसभर #महाराष्ट्रदिन साजरा करा www.lokmat.com सोबत

 #अभिमानमहाराष्ट्राचा या हॅशटॅगने ट्विटही करा. 

महाराष्ट्रदिनी दिवसभर वर्तमानातही इतिहास घडवू पाहणाऱ्यांचा महाराष्ट्रानं अभिमान बाळगावी अशी कर्तृत्वगाथा. फक्त आपल्या www.lokmat.com वर.

- तुळशीदास भोईटे

Web Title: Maharashtra Day 2018 : Inspirational Personalities in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.