महाराष्ट्रात वंशाला दिवाच, मुलींच्या जन्मदरात घट

By Admin | Published: April 15, 2017 09:13 AM2017-04-15T09:13:08+5:302017-04-15T09:13:40+5:30

अहवालानुसार जिथे 2015 मध्ये 1000 मुलांमागे 907 मुली होत्या तिथे 2016 मध्ये हा आकडा 899 वर पोहोचला आहे

In Maharashtra, the decline in the birth of the bride, the birth of girls | महाराष्ट्रात वंशाला दिवाच, मुलींच्या जन्मदरात घट

महाराष्ट्रात वंशाला दिवाच, मुलींच्या जन्मदरात घट

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 15 - महाराष्ट्रातील स्त्री-पुरुष जन्मदरात घट झाल्याची माहिती समोर आली आहे. आधीच्या वर्षांशी तुलना करता 2016 मध्ये तब्बल आठ टक्क्यांनी जन्मदर घसरला आहे. राज्य आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या अहवालामधून ही माहिती मिळाली आहे. अहवालानुसार जिथे 2015 मध्ये 1000 मुलांमागे 907 मुली होत्या तिथे 2016 मध्ये हा आकडा 899 वर पोहोचला आहे.
 
नागरी नोंदणी प्रणालीवर आधारित या अहवालानुसार पुण्यामध्ये 2014 पर्यंत स्त्री-पुरुष जन्मदरात प्रगती होत असल्याचं दिसत होतं. पण 2015 मध्ये हा आकडा 1000/891 वर आला आणि 2016 मध्ये तर तब्बल 53 टक्क्यांनी घसरुन 1000/838 वर आला. स्त्री-पुरुष जन्मदरात घसरण होणा-या राज्यांमध्ये वाशिम पहिल्या क्रमांकावर असून 62 टक्क्यांनी खाली आला आहे. तर यानंतर पुणे आणि उस्मानाबादचा क्रमांक असून तिथे 53 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. 
 
"दर 1000 मुलांमागे 951 मुली असणे गरजेचं आहे. जर मुलींची संख्या 920 हून कमी असेल तर मुलींना जन्म देताना भेदभाव केला जात असल्याचं आपण म्हणू शकतो", असं डॉ अरोकियास्वामी यांनी सांगितलं आहे.
 
मुंबईत जन्मदर 1000/936 आहे. हा खूप चांगला आकडा नसला तरी परिस्थिती जरा बरी आहे असंच म्हणावं लागेल. मुंबईत जिथे 2014 मध्ये 1000 मुलांमागे 931 मुली असा जन्मदर होता तो 2015 मध्ये 926 वर आला होता. जिथपर्यंत मुंबईचा प्रश्न आहे स्त्री-पुरुष जन्मदर स्थिर असल्याचं आरोग्य अधिकारी असतात. 
 
"महाराष्ट्रातील मुख्य शहरांमध्ये जन्मनोंद 1000 टक्के आहे. मुंबई, पुणेसारख्या शहरांमध्ये नोंदणी शंभर टक्के असताना ग्रामीण भागात तितकी होत नाही. एकतर नोंदणी होत नाही किंवा ते मूल रुग्णालयात जन्माला आलेलं नसतं, ज्यामुळे अर्धवट माहिती हाती येते", असं डॉ अरोकियास्वामी सांगतात. भारतामधील अनेक ठिकाणी फक्त 80 ते 85 टक्के जन्मनोंदणी होते.
 
दुसरीकडे भंडारा येथे मात्र जन्मदरात कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. भंडा-यात 78 टक्क्यांची वाढ असून यानंतर अनुक्रमे परभणी आणि लातूरचा क्रमांक आहे. बीड जिल्हा जो 2011 मध्ये एकदम खालच्या क्रमांकावर होता त्यानेही प्रगती दाखवली आहे. 
 

Web Title: In Maharashtra, the decline in the birth of the bride, the birth of girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.