महत्वाची अपडेट! एकनाथ शिंदे ४ जुलै रोजी बहुमत चाचणीला सामोरे जाणार; 3 जुलैपासून विशेष अधिवेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 05:39 PM2022-07-01T17:39:28+5:302022-07-01T17:45:27+5:30

Eknath Shinde, Devendra Fadanvis News: दाबोळी विमानतळावरून मुंबईकडे निघताना बहुमत चाचणी सहजपणे पार करू शकेन, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Maharashtra: Eknath Shinde govt to face floor test on July 4; Special session from 3 July | महत्वाची अपडेट! एकनाथ शिंदे ४ जुलै रोजी बहुमत चाचणीला सामोरे जाणार; 3 जुलैपासून विशेष अधिवेशन

महत्वाची अपडेट! एकनाथ शिंदे ४ जुलै रोजी बहुमत चाचणीला सामोरे जाणार; 3 जुलैपासून विशेष अधिवेशन

Next

राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईत येण्यासाठी निघाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारला आहे. थोड्याच वेळात फडणवीस ताजमध्ये भाजपाच्या आमदारांसोबतच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. यातच बहुमत चाचणी कधी होणार, यावरून पडदा हटला आहे. 

राज्यपालांनी बोलविलेले विशेष अधिवेशन काहीसे पुढे ढकलण्यात आले आहे. आता तीन आणि ४ जुलै रोजी हे अधिवेशन होणार आहे. यात तीन जुलै रोजी विधान सभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि ४ जुलै रोजी शिंदे सरकारला फ्लोअर टेस्टला सामोरे जावे लागणार आहे. 

दाबोळी विमानतळावरून मुंबईकडे निघताना बहुमत चाचणी सहजपणे पार करू शकेन, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच भाजपाचे १२० आमदार आणि शिवसेनेचे ५० आमदार असे १७० एवढे बहुमत असल्याचे ते म्हणाले. यामुळे विधान सभा अध्यक्ष देखील सहज जिंकतील.

गुवाहाटीवरून गोव्याला गेलेले बंडखोर आमदार शनिवार, २ जुलै रोजी मुंबईत दाखल होणार आहेत. शिवसेना बंडखोर आणि इतर अपक्ष आमदार मुंबईत दाखल झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदारांना संबोधित करण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
 
 

Web Title: Maharashtra: Eknath Shinde govt to face floor test on July 4; Special session from 3 July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.