महाराष्ट्रात सत्तास्थापनेला सर्वाधिक उशीर कधी झाला अन् किती?... जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 07:38 PM2019-11-07T19:38:59+5:302019-11-07T19:44:11+5:30

Maharashtra Election 2019: निकालाला १५ दिवस होऊनही सरकारस्थापनेचा मुहूर्त ठरलेला नाही.

Maharashtra Election 2019: After 2004 and 2009 Assembly election it took 17 days to form government | महाराष्ट्रात सत्तास्थापनेला सर्वाधिक उशीर कधी झाला अन् किती?... जाणून घ्या!

महाराष्ट्रात सत्तास्थापनेला सर्वाधिक उशीर कधी झाला अन् किती?... जाणून घ्या!

Next
ठळक मुद्दे विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ ऑक्टोबरला जाहीर झाला. भाजपा-शिवसेना-रिपाइं-रयत क्रांती-रासप-शिवसंग्राम या पक्षांच्या महायुतीला जनतेनं स्पष्ट बहुमत दिलं.निकालाला १५ दिवस होऊनही सरकारस्थापनेचा मुहूर्त ठरलेला नाही.

'कटप्पाने बाहुबली को क्यों मारा', हा प्रश्न काही वर्षांपूर्वी ज्याच्या त्याच्या मनात निर्माण झाला होता. त्या प्रश्नापेक्षा गहन प्रश्न सध्या महाराष्ट्रीय जनतेला पडला आहे. तो म्हणजे, सरकार स्थापन कधी होणार आणि ते कोण करणार? विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ ऑक्टोबरला जाहीर झाला. भाजपा-शिवसेना-रिपाइं-रयत क्रांती-रासप-शिवसंग्राम या पक्षांच्या महायुतीला जनतेनं स्पष्ट बहुमत दिलं. मात्र, निकालाला १५ दिवस होऊनही सरकारस्थापनेचा मुहूर्त ठरलेला नाही. भाजपा आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू आहे, एकमेकांना भाऊ-भाऊ म्हणणारे एकमेकांची तोंडं पाहायलाही तयार नाहीत, उलट त्यांच्यात दबावाचं, इशाऱ्यांचं, धमक्यांचं राजकारण सुरू आहे. एकमेकांकडे बोट दाखवून दोघंही मोकळे होताहेत. त्यामुळे मतदार नाराज झालेत, वैतागलेत. बळीराजा तर हवालदिल झालाय. काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते प्रामुख्याने भाजपाला लक्ष्य करत आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची चिन्हं आहेत.  

या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात सत्तास्थापनेला सर्वाधिक उशीर कधी आणि किती झाला, हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. १९९५ ते २०१९ या दरम्यान राज्यात झालेल्या निवडणुका पाहिल्यास, १९९५ मध्ये सर्वात वेगाने सरकार स्थापन झाल्याचं दिसतं, तर २००४ आणि २००९ मध्ये सत्तास्थापना यंदासारखीच खूप रखडली होती. 

१९९५ विधानसभा निवडणूक - निकालानंतर एका दिवसात शपथविधी

निवडणुकीचा दिनांकः ९ आणि १२ फेब्रुवारी १९९५
निकालाची तारीखः १३ मार्च १९९५
मुख्यमंत्र्यांचा शपथविधीः १४ मार्च १९९५

१९९९ विधानसभा निवडणूक - निकालानंतर १२ व्या दिवशी शपथविधी

निवडणुकीचा दिनांकः ११ सप्टेंबर १९९९
निकालाची तारीखः ७ ऑक्टोबर १९९९
मुख्यमंत्र्यांचा शपथविधीः १८ ऑक्टोबर १९९९

२००४ विधानसभा निवडणूक - निकालानंतर १७व्या दिवशी शपथविधी


  
निवडणुकीचा दिनांकः १३ ऑक्टोबर २००४
निकालाची तारीखः १६ ऑक्टोबर २००४
मुख्यमंत्र्यांचा शपथविधीः १ नोव्हेंबर २००४

२००९ विधानसभा निवडणूक - निकालानंतर १७व्या दिवशी शपथविधी

निवडणुकीचा दिनांकः १३ ऑक्टोबर २००९
निकालाची तारीखः २२ ऑक्टोबर २००९
मुख्यमंत्र्यांचा शपथविधीः ७ नोव्हेंबर २००९

२०१४ विधानसभा निवडणूक - निकालानंतर १३व्या दिवशी शपथविधी

निवडणुकीचा दिनांकः १५ ऑक्टोबर २०१४
निकालाची तारीखः १९ ऑक्टोबर २०१४
मुख्यमंत्र्यांचा शपथविधीः ३१ ऑक्टोबर २०१४

२०१९ विधानसभा निवडणूक - शपथविधीची प्रतीक्षा

निवडणुकीचा दिनांकः २१ ऑक्टोबर २०१९
निकालाची तारीखः २४ ऑक्टोबर २०१४
मुख्यमंत्र्यांचा शपथविधीः ७ नोव्हेंबरपर्यंत झालेला नाही

महत्त्वाच्या राजकीय बातम्याः

शिवसेना-भाजपाला तिढा सोडवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी असा 'सांगितला' फॉर्म्युला!

असा असणार उद्धव ठाकरेंचा 'ए'-'बी' प्लॅन; शिवसेनेच्या आमदारानेच केला खुलासा

स्वतःला शिवसैनिक म्हणवणाऱ्यांनी आमचे संस्कारही घ्यावेत; संजय राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांवर हल्ला

बच्चू कडूंनी सुचवली भन्नाट युक्ती; भाजपा-शिवसेना दोघांचीही होईल 'स्वप्नपूर्ती'

'पवार साहेबां' च्या मनातला 'मुख्यमंत्री' बहुदा ठरलाय की काय?

Web Title: Maharashtra Election 2019: After 2004 and 2009 Assembly election it took 17 days to form government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.