Maharashtra Election 2019 : भाऊ आहे मोठा खर्चाला नाही तोटा म्हणणे पडणार महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 07:00 AM2019-10-05T07:00:00+5:302019-10-05T07:00:07+5:30

निवडणूकांचे बिगुल वाजले की, उमेदवारांकडून प्रचंड प्रमाणात खर्च केला जातो..

Maharashtra Election 2019 : big expenditure problematic for political leaders | Maharashtra Election 2019 : भाऊ आहे मोठा खर्चाला नाही तोटा म्हणणे पडणार महागात

Maharashtra Election 2019 : भाऊ आहे मोठा खर्चाला नाही तोटा म्हणणे पडणार महागात

googlenewsNext
ठळक मुद्देनिवडणूक आयोगाकडून खर्चाची मर्यादा : विविध गोष्टींकरिता दरपत्रक केले जाहीर

पुणे : निवडणूकांचे बिगुल वाजले की, उमेदवारांकडून प्रचंड प्रमाणात खर्च केला जातो. मतदारांना पैशांचे, वेगवेगळ्या वस्तुंचे अमिष दाखवून आपल्या बाजुने मतदान करण्याकरिता उमेदवार प्रयत्नशील असतात. अशाप्रकारच्या खर्चावर नियंत्रण यावे यासाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चावर बंधने आणली आहेत. त्यांना प्रचाराकरिता २८ लाख रुपयांची मयार्दा आखून दिली आहे. या नियमांना डावलून खर्च करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे. 
जिल्हा प्रशासनाने जेवण, नाष्टा, चहासह विविध खचार्चे दरपत्रक प्रसिध्द केले आहे. त्यात एकूण 190 विविध गोष्टींकडे उमेदवारांचे लक्ष वेधले असून प्रशासनाने जाहीर केलेल्या दरानुसारच उमेदवाराला खर्च करावा लागणार आहे. यानुसार उमेदवारांना कार्यकर्त्यांच्या शाकाहारी जेवणासाठी ७० रुपये, मांसाहारी जेवणासाठी १४० रुपये, पोहे, उपीटसाठी १० रुपये, साबुदाणा खिचडी १५ रुपये, चहा ४ रुपये, कॉफी - ५ रुपये, तर वडापावसाठी १२ रुपये मोजावे लागणार आहेत. निवडणूक जिंकण्याच्या अट्टहासापोटी पैशाचा महापूर वाहू नये आणि वारेमाप खर्चावर नियंत्रण रहावे, या हेतूने निवडणूक आयोगाने खचार्ची मयार्दा आखून दिली आहे. खर्चाच्या या मयार्देचे पालन होते की नाही, यावर निवडणूक आयोगाचे लक्ष राहणार आहे. त्यासाठी भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथके तैनात करण्यात आली आहेत. आयकर विभाग, खर्च नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने हे दरपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार, उमेदवारांच्या सभा, रॅलीसाठी लागणारे साहित्याची किंमत निश्चित करण्यात आली आहे. प्रचार फेऱ्यांपूर्वी फटाके वाजविल्यास त्याचेही दर नमूद करण्यात आले आहेत. प्रचार कार्यालयात वापरल्या जाणा-या वस्तू, बॅनर-पोस्टर यांचेही दर ठरविण्यात आले असून, उमेदवाराने दाखविलेल्या खचार्सोबत त्याची पडताळणी केली जाणार आहे.
.....
* उमेदवारांनो दरपत्रक पाहिले का...? 

जेवण
शाकाहारी जेवण - ७० रुपये
मांसाहारी जेवण - १४० रुपये
फूड पॅकेट - पाच पुरी, सुकी भाजी, लोणचे, चटणी - २५ रुपये
एक लीटर पाण्याची बाटली - १० रुपये
बिस्कीटे - ५ रुपये
.......
प्रचार सभा
कापडी मंडप पत्रा शेडसह - प्रति चौरस मीटर - २१० रुपये
कापडी मंडप साधा - प्रति चौरस मीटर - ११० रुपये
फायबर, प्लास्टिक खुर्च्या - प्रति नग - ८ रुपये
कापडी सतरंजी - प्रति नग - ५५ रुपये
साउंड सिस्टीम सेट - प्रति नग - ३९२५
टेबल फॅन - ३००
.....
फटाके (प्रति नग)
एक हजाराची माळ - १५० रुपये
पाच हजाराची माळ - ७५० रुपये
.....
अन्य वस्तू (प्रति नग)
साधे फेटे - १५० रुपये
गांधी टोपी - १५ रुपये
शाल - १०० रुपये
पुणेरी पगडी - ३५० रुपये
.....
  

Web Title: Maharashtra Election 2019 : big expenditure problematic for political leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.