Maharashtra Election 2019: ''10 रुपयात जेवण द्यावं लागणं ही चिंतनाची बाब; लोकांची आर्थिक शक्ती वाढवा''
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 03:08 PM2019-10-14T15:08:53+5:302019-10-14T15:10:02+5:30
Maharashtra Election 2019: शिवसेनेकडून या जाहीरनाम्यात 10 रुपयांमध्ये जेवण्याच्या थाळीसह विविध आश्वसन देण्यात आली आहे.
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी मातोश्रीवर शिवसेनेचा जाहीरनामा प्रकाशित केला होता. शिवसेनेकडून या जाहीरनाम्यात 10 रुपयांमध्ये जेवण्याच्या थाळीसह विविध आश्वसन देण्यात आली आहे. मात्र शिवसेनेच्या 10 रुपयांत जेवण देणं यावर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टोला लगावला आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, 10 रुपयांना जेवण देणं वाईट नाही. परंतु 10 रुपयांमध्ये राज्यात जेवण द्यावं लागण हा चिंतण करण्यासारखा विषय आहे. तसेच लोकांची आर्थिक शक्ती वाढवा असं म्हणत शिवसेनेच्या 10 रुपयांच्या जेवणाच्या थाळीवर टोला लगावला आहे.
शिवसेनेने युतीची सत्ता राज्यात आल्यानंतर दहा रुपयांत सामान्य माणसांना सकस जेवण दिले जाईल. एक रुपयात हृदयरोग आणि अन्य आरोग्य चाचण्या करण्यासाठी केंद्र उभे केले जाईल. महिलांच्या सुरक्षिततेसाठी बससेवा सुरू केली जाईल तसेच ३00 युनिटपर्यंतचा वीजदर ३0 टक्के कमी केला जाईल या सोबतच वरिष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना, महिला सक्षमीकरणावर भर, महिला बच गटासाठी जिल्हास्तरावर कँटीन प्रवासासाठी समन्वयक केंद्रांची स्थापना, खतांचे दर 5 वर्ष स्थीर राहतील, याची योजना, नुकसानग्रस्त शेतकऱ्याला पीकविमा मिळणार, शेतकऱ्यांना कर्जमुक्त, गरजू शेतकऱ्यांना दरवर्षी 10 हजार देणार असल्याचे जाहीरनाम्यात म्हणटले आहे.